हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक तसेच बॉलिवूड अभिएन्ट्री आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, महेश भट्ट यांच्या हृदयावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली आहे. दरम्यान महेश भट्ट ७४ वर्षांचे आहेत. गेल्या महिन्यात त्यांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली होती आणि रिपोर्टनुसार लवकरच शस्त्रक्रियेची गरज भासल्याने हि शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबत महेश भट्ट यांचा मुलगा राहुलने माहीत दिली आहे.
एका वृत्त वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, महेश भट्ट यांचा मुलगा राहुल याने वडील महेश भट्ट त्यांच्यावरील शस्त्रक्रियेच्या बातमीची पुष्टी केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला त्याच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्याने सांगितले. याविषयी बोलतांना राहुलने हेल्थ अपडेट दिली आहे. तो म्हणाला, ‘ऑल इज वेल दॅट एन्ड वेल. ते (महेश भट्ट) आता ठीक आहे आणि घरी परतले आहे. मी तुम्हाला अधिक तपशील देऊ शकत नाही कारण हॉस्पिटलमध्ये अनेक लोकांना जाण्याची परवानगी नव्हती.’
#MaheshBhatt was ADMITTED to the hospital for a Heart Surgery – EXCLUSIVEhttps://t.co/omUqbIQPD1
— ETimes (@etimes) January 20, 2023
बॉलिवूड सिनेसृष्टील एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारे महेश भट्ट यांनी वयाच्या २६ व्या वर्षी ‘मंजिलें और भी हैं’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर पुढे विविध धाटणीचे चित्रपट त्यांनी सिनेसृष्टीला दिले. आज महेश भट्ट बॉलिवूडमधील टॉप फिल्ममेकर्सपैकी एक म्हणून ओळखले जातात. यामुळे त्यांचाही स्वतःचा एक फॉलोवर्सचा मोठा आकडा आहे. आगामी काळात अजून एंटरटेनिंग चित्रपटांची त्यांच्याकडून आशा आहे. त्यामुळे ते लवकरच बरे व्हावे यासाठी सिनेविश्वातून प्रार्थना केल्या जात आहेत.
० अँजिओप्लास्टी म्हणजे काय.?
अँजिओप्लास्टी ही एक अशी शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्या उघडल्या जातात. या रक्तवाहिन्यांना वैद्यकीय भाषेत ‘कोरोनरी रक्तवाहिन्या’ असे म्हणतात. अँजिओप्लास्टी तेव्हा करावी लागते जेव्हा हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या समस्या जाणवतात. अशावेळी डॉक्टर रुग्णाच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतात.
Discussion about this post