हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिऍलिटी शो अर्थातच बिग बॉस मराठीमध्ये रोजच काही ना काही राडे, दंगे, प्रेम, दोस्ती अशा विविध भावनांमुळे विविध किस्से घडत असतात. कुणाला कुणावर ईर्ष्या असते तर कुणाला कुणावर प्रेम जडतं. हे बिग बॉसचं घर आहे ना इथे सगळं असंच घडतं. पण मनावर आणि वागण्यावर ताबा असायला हवाच. याकरिता कुणी तरी वेळीच कान पिळायला हवे. म्हणूनच बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर हे काम अगदीच शिताफीने करताना दिसतात. त्यांची चावडी आणि चावडीतली शाळा सगळ्यांना आवडते.
तर आज बिग बॉस मराठीच्या चावडीत एक, दोन, तीन नाही तर सगळ्याच स्पर्शकांचा क्लास लागणार आहे. यात एखाद्याला थोडीशी शाबासकी मिळू शकते. पण बऱ्यापैकी सगळ्यांना इथे आज आपल्याला चुकांची यादी पहायला मिळणार आहे. आज चावडीवर मांजरेकर सगळ्यांचा क्लास लावणार आहेत आणि प्रत्येकाच्या चुकांचा भेदभाव न करता हिशोब मांडणार आहेत. या आठवड्यात बरेच टास्क असे झाले जिथे स्पर्धकांनी तुफान राडेबाजी केली आहे. त्यामुळे दंगे केले तर निस्तरावं लागणार ना.
आतापर्यंत चाळीस दिवसात चार स्पर्धक पुन्हा घरी परतले तर एका नवीन स्पर्धक अर्थात वाईल्ड कार्ड म्हणून स्नेहलता वसईकरची एंट्री झाली. यानंतर घातली काही समीकरण बदलली तर काही बिघडली. या आठवड्यात बिग बॉसने ‘कॉलेज’ ही थीम दिली होती आणि हे स्पर्धक खरोखरच कॉलेजच्या वातावरणात घुसले आणि अगदी प्रेम, दोस्ती, दुनियादारी ते मारामारी पर्यंत पोहोचले. म्हणूनच आजची चावडी खास आहे. नुकताच एक प्रोमो आउट झाला आहे. ज्यामध्ये मांजरेकर म्हणतात कि, ‘या आठवड्यात कॉलेज लाईफमध्ये दुनियादारी बघायला मिळाली. काही हमरीतुमरीला आले तर काही सच्चे यार झाले. त्यामुळे हे सगळेच आहेत आपल्या हिटलिस्टवर.. तेव्हा भेटूया बिग बॉसच्या चावडीवर’.
Discussion about this post