Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सत्या मांजरेकरची नवी सुरुवात! अभिनयानंतर खाद्य विश्वात पदार्पण करत ‘सुका सुखी’ हॉटेल चालवणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 19, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Satya Mahesh Manjrekar
0
SHARES
459
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि अत्यंत लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर चर्चेत असण्यासाठी छोटंसं कारणसुद्धा पुरतं. गेली अनेक वर्ष मांजरेकर मराठी तसेच बॉलिवूड सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. मांजरेकरांनी स्वतःच्या नावाचा जणू एक ब्रँड तयार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. थोडं कौतुक आणि खूप ट्रोलिंग हे यामागचं मुख्य कारण. या चित्रपटात महेश मांजरेकरांच्या लेक सत्या मांजरेकर मावळ्याच्या रूपात प्रेक्षकांसमोर येताच त्याच्यवर फ्लॉपचा ठपका बसला. यानंतर आता सत्याची नवी इनिंग सुरु झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Satya Manjrekar (@satyamanjrekar)

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूकनंतर सत्या मांजरेकर हे नाव जोरदार चर्चेत आलं आणि तेव्हढंच ट्रोलही झालं. त्याच्या लूकची आणि अभिनयाची नेटकऱ्यांनी चांगलीच थट्टा उडवली. मांजरेकरांनी स्वतःचा चित्रपट आहे म्हणून मुलाला घुसवलं अशी म्हटलं गेलं. पण यांपैकी कोणत्याही ट्रोलिंगवर सत्या किंवा महेश मांजरेकर यांनी व्यक्त होणे गरजेचे समजले नाही. ज्यामुळे काही महिन्यांत हे ट्रोलिंग थांबलं. सत्या त्याच्या वडिलांसारखा एक उत्तम नट असूच शकत नाही म्हणत प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयावर शंका उपस्थित केली. यानंतर आता अभिनयासहा सत्या थेट हॉटेल इंडस्ट्रीमध्ये उतरला आहे. एका नव्या क्षेत्रात त्याने नवी संधी निर्माण करत नशीब आजमावला घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Suka Sukhi (@sukasukhi)

त्यामुळे महेश मांजरेकरांचा लेक सत्या मांजरेकर आता हॉटेल बिझनेसमध्ये कितपत पाय रोवणार हे पाहणे औत्सुक्याचे राहील. तर सत्याने स्वतः दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या या हॉटेलचं नाव ‘सुका सुखी.. द मांजरेकर्स किचन’ असं आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. सत्याच्या या हॉटेलची खासियत आणि विशेष आकर्षण इथला मेन्यू असणार आहे. या हॉटेलच्या मुख्य मेन्यूमध्ये सुकी मच्छी आणि त्याचे विविध पदार्थ समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे सत्या खवैय्यांच्या पोटातून मनात शिरण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसणार आहे. सत्याच्या या हॉटेलमध्ये चविष्ट पदार्थ खाणाऱ्यांची चंगळ असणार अशी आशा आहे.

Tags: hotelInstagram PostMahesh ManjrekarSatya ManjrekarViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group