Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘.. ढुंकूनही पाहत नव्हती’; महेश टिळेकरांनी दाखवला बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचा खरा चेहरा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 5, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
21.9k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. विविध विषयांवर आपले परखड मत प्रदर्शन करण्यासाठी ते ओळखले जातात. अनेकदा सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि राजकारण अशा विविध विषयांवर ते बोलताना दिसतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी करीना कपूरची चाहत्यांशी वागण्याची पद्धत, राधिका आपटेचा दुटप्पीपणा दर्शवणारे किस्से सांगितले आहेत. शिवाय त्या मराठी अभिनेत्रीचे नाव न घेता ती लाळघोटेपणा करत करीना कपूरच्या मागे कशी गेली याचादेखील एक किस्सा त्यांनी सांगितला आहे. त्यांची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

हि पोस्ट शेअर करताना महेश टिळेकर यांनी लिहिले आहे कि, ‘कुठं मूर्ती आणि कुठे करीना..? नुकताच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ पाहिला ज्यात ते सांगत होते की लंडनहून ते भारतात येत असताना फ्लाईटमध्ये त्यांच्या पुढच्या सीटवर करीना कपूर बसली होती. फ्लाईटमधील काही लोक नारायण मूर्ती यांच्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करत होते, दोन शब्द बोलत होते आणि लोक आपल्याला रिस्पेक्ट देतायेत म्हणून मूर्ती उभे राहून त्यांच्याशी संवाद साधत होते. पण काही चाहते करीना कपूरजवळ जाऊन तिला हॅलो म्हणत होते. तर ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती आणि ही गोष्ट नारायण मूर्ती यांना खूप खटकल्याचे त्यांनी सांगितले आणि करिनाचा असा इगो काय कामाचा..? असा प्रश्नही त्यांनी केला’.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Tilekar (@maheshtilekar)

पुढे लिहिलंय, ‘8 वर्षांपूर्वी आमचा मराठी तारका कार्यक्रमाचा परदेशातून शो करून एअरपोर्ट वर आल्यावर पुन्हा तिथे चेकिंग साठी असणाऱ्या रांगेत मी उभा होतो. तर आमच्या कार्यक्रमातील एका मराठी अभिनेत्रीच्या पुढे करीना कपूर उभी होती. तिचा पासपोर्ट दाखवून ती पुढे वळताना तिचा चेहरा दिसला तसा आपली मराठी अभिनेत्री तिच्याशी बोलायला म्हणून लाळ घोटेपणा करत तिच्या मागे धावत गेली. पण करीना तिला फाट्यावर मारत झपाझप पावले टाकत पुढे निघून गेली. बरं याच मराठी अभिनेत्रीने करीना कपूरच्या एका लोकप्रिय सिनेमात एका सिनसाठी नगण्य भूमिका केली होती. तरीदेखील करीनाने तिच्याकडे मान वळवून ही पाहिलं नाही, फोटो काढणं तर दूरच. पण हेच स्वतः च्या प्रेमात असणारे काही सेलिब्रिटी यांचा एखादा सिनेमा रिलीज व्हायचा असेल तेंव्हा जनमानसात मिसळून , चाहत्यांबद्दल प्रेम असल्याचा जो अभिनय करतात त्याला खरच तोड नाही’.

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

‘मागे एका इंटरव्ह्यूमध्ये हिंदीत काम करणारी मराठी अभिनेत्री राधिका आपटे हिने तिला लोकांना फोटो, सेल्फी द्यायला आवडत नाही, ती सही पण देत नाही चाहत्यांना असं सांगत होती. पण काहीच दिवसांपूर्वी OTT वर रिलीज झालेल्या तिच्या एका हिंदी सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने मात्र सोशल मीडियावर पॉप्युलर असणाऱ्या काही इन्फ्लुंसरबरोबर सेल्फी देऊन स्वतः ची प्रसिध्दी करून घेत होती. बरं या बयेला ती कुठं राहते तो पत्ता पण लोकांना, तिच्या चाहत्यांना कळू नये असं वाटतं. जर समजलं लोकांना ही कुठं राहते मुंबईत तर काय फरक पडणार आहे..? अमिताभ बच्चन, सलमान, शाहरुख यांना पहायला जशी गर्दी जमते तसा जनसमुदाय हीची एक झलक दिसावी म्हणून हिच्या बिल्डिंगबाहेर जमा होणार आहे का..??? जेव्हा कामे मिळणं बंद होतं, प्रसिद्धीचा काळ संपतो तेंव्हा कुणीतरी आपली दखल घ्यावी म्हणून बेचैन होणारे अनेक नट नट्या मी जवळून पाहिले आहेत’.

Tags: Director Mahesh TilekarInstagram PostKareena Kapoor-khanRadhika Apteviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group