Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

महिमाच्या धैर्याची आणि कॅन्सरची कहाणी; अनुपम खेर यांची प्रेरणादायी पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mahima Choudhry
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी हीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे अभिनेता अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करीत सांगितले आहे. हि अतिशय धक्कादायक बाब असून अद्याप महीमाच्या आजारपणाविषयी कुठेच वाच्यता करण्यात आलेली नाही. गेल्या बऱ्याच काळापासून महिमा या जीवघेण्या आजारावर उपचार घेत होती. मात्र याबाबत तिने कधीही कुठे उल्लेख केला नाही. मात्र आता अखेर तिने आपल्या भीतीशी दोन होत करत आपल्याला कॅन्सर झाल्याचे चाहत्यांना सांगितले आहे. हे सांगताना अनुपम खेर यांनी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय आणि महिमाच्या धैर्याची आणि कॅन्सरची कहाणी असे कॅप्शनही त्याला दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

महिमाच्या आजारपणाविषयी आज जेव्हा तिच्या चाहत्यांना कळलं तेव्हा अनेकांना हादरा बसला आहे. हि बातमी वाऱ्यासारखी पसरताच महिमाच्या चाहत्यांनी तिच्याप्रती सहानुभूती आणि काळजी व्यक्त केली आहे. महिमाने या भयंकर आजारातून लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना ते करत आहेत. अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओतून महिमाच्या धैर्याची कहाणी तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचली आहे. अनेकांनी या पोस्टवरच वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत आणि यातूनच महिमाला मानसिक आधार देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. याआधी अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांनाही कॅन्सरशी सामना करावा लागला आहे. त्यामुळे अनुपम खेर यांच्यासाठी महिमाच्या आजारपणाची गोष्ट हि फार भावुक करणारी होती.

View this post on Instagram

A post shared by Mahimachaudhry (@mahimachaudhry1)

अभिनेता अनुपम खेर यांनी शेयर केलेल्या या व्हिडिओमधून त्यांनी महिमाला ‘हिरो’ असे संबोधले आहे. अनुपम यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय आणि सोबत एक मोठं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनची सुरुवात महिमाच्या धैर्याची आणि कॅन्सरची कहाणी असे लिहीत केले आहे. पुढे लिहिलं आहे की, मी एका चित्रपटाच्या निमित्तानं तिला फोन केला होता. त्यात महिमानं काम करावं अशी माझी इच्छा होती. तिला ज्यावेळी फोन केला तेव्हा तिनं मला कॅसर झाल्याचे सांगितले. तिचा संघर्ष, दृष्टिकोन हे सारं मला प्रेरणा देणारं होतं. त्यानंतर ही गोष्ट मी तिला इतरांना सांगण्यासाठी प्रवृत्त केले.

View this post on Instagram

A post shared by Mahimachaudhry (@mahimachaudhry1)

या व्हिडिओमध्ये महिमा चौधरीचा बाल्ड लूक स्पष्ट दिसून येतोय. तिचा असा लूक सर्वांसाठी धक्कादायक आहे. या सगळ्यात दिलासादायक बाब अशी की, स्क्रिनिंगच्यावेळी महिमाला कॅन्सरचे निदान झाले आणि तिने योग्यवेळी वैदयकीय उपचार घेऊन त्याजागेवरील कँसर सेल हटविल्या आहेत. अनुपम यांनी शेअर केलेल्या साडेसात मिनिटांच्या व्हिडिओतून महिमा तिच्या आजाराविषयी बोलताना दिसतेय. हाच व्हिडीओ महिमानेही तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये तिने अनुपम खेर याना धन्यवाद दिले आहेत.

Tags: anupam kherBollywood ActressInstagram PostMahima ChaudhryViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group