हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर वारंवार चर्चेत असणारे बॉलिवूडचे ट्रेंडिंग कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. मलायका आणि अर्जुन एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत हि बाब समोर आल्यापासून सोशल मीडियावर नेटकरी याना नेहमीच ट्रोल करताना दिसतात. पण मलायका आणि अर्जुन ट्रोलिंगला न जुमानता आपले प्रेम व्यक्त करायला कधीच मागे सरकलेले नाहीत. याहीवेळी त्यांनी नवीन वर्षानिमित्त एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी नको नको तशा कमेंट शेअर केल्या आहेत.
सोशल मीडियावर मलायकाला फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पण चाहत्यांसह ट्रोलर्सची संख्याही काही कमी नाही. मलायकाने या वयातही आपली फिगर मेंटेन ठेवल्यामुळे तिचे नेहमीच कौतुक होत असते. पण मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तितकीच ट्रोलसुद्धा होताना दिसते. अरबाजसोबत घटस्फोट आणि अर्जुनसोबत रिलेशन यावर वारंवार तिला ट्रोल केले जाते. आपल्या वयापेक्षा खूपच लहान असणाऱ्या अर्जुनला डेट केल्यामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर नेहमीच मलायका असते. या न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मलायका आणि अर्जुन राजस्थानातील रणथंबोरच्या जंगल सफरीवर गेले होते. यावेळी त्यांचे मित्र परिवार देखील होते. या निमित्ताने मलायकाने अर्जुनला किस करतानाच एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
खरंतर हा फोटो नीट पाहिला तर समजेल कि मलायका अर्जुनच्या गालावर किस करते आहे. पण ट्रोलर्सचं ते.. त्यांचं तोंड कोण बंद करणार.? हा फोटो पाहून अनेकांनी म्हटले आहे कि, ‘बस झालं आता किस वीस.. लग्न करा आणि मोकळे व्हा’. तर काहींनी मलायकाच्या कॅप्शनला टार्गेट केलं आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘लव इन लाईट २०२३’. तर यावर एका ट्रोलरने म्हटले आहे कि, ‘लव्ह इन लाईट नाही.. हवस ऍट टाइम आहे’. तर एकाने असेही लिहिले आहे कि, ‘या वयात प्रेम वगैरे काही होत नाही.. हि फक्त हवस आहे’.
Discussion about this post