Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर झाले एन्गेज; खरंच? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 14, 2021
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Arjun Malaika
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे नाते काही लपविण्याजोगे नाही. त्यांनी नेहमीच उघड उघड आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. कित्येकदा ते दोघे एकत्र फिरताना देखील दिसतात. दोघांच्या कुटुंबानेही हे नाते स्वीकारले आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती ती त्यांच्या मिस्टर आणि मिसेस होण्याची. तसेच आता असे वाटतेय कि ह्या दिशेने मलायका आणि अर्जुन सरावले आहेत. नुकताच मलायका अरोराने शेअर केलेल्या एका फोटोमुळे त्यांचा साखरपुढा झाला, अशी चर्चा जोरदार सुरु आहे. कारण या फोटोत मलायकाच्या बोटातील अंगठी स्पष्ट दिसून येतेय. यामुळे तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मलायकाने स्वत:चे दोन फोटो तिच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. यानंतरच मलायका- अर्जुनची एन्गेजमेंट झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या फोटोत मलायकाच्या बोटातील रिंग स्पष्ट दिसतेय. ‘किती सुंदर अंगठी आहे. मला ही खूप आवडते. येथून आनंदाला सुरूवात होते. आयुष्यातल्या प्रेमासाठी काही प्लॅन असेल तर ही साखरपुड्याची अंगठी एकदम मस्त आहे,’ असे या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये मलायकाने लिहिले. मलायकाच्या या पोस्टनंतर तिने व अर्जुनने साखरपुडा केला अशी चर्चा सुरू झाली. यानंतर चाहत्यांनी मलायका आणि अर्जुनवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

पण खर सांगायचं तर मलायका व अर्जुनला शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. ती म्हणजे अशी कि, तूर्तास तरी या दोघांचा साखरपुढं झालेला नसून हे केवळ एका ब्रँडचे प्रमोशन आहे. कारण मलायका व अर्जुनने साखरपुढ्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. शिवाय मलायकाने तिच्या एकटीचाच हा फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये अर्जुन कुठेच नाही. तेव्हा हा फक्त आणि फक्त ब्रँड प्रमोशन फोटो असल्याचे म्हटले जातेय.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

मलायका आणि अर्जुन यांच्यात वयाचा बराच फरक आहे. मलायका 47 वर्षांची आहे तर अर्जुन 35 वर्षांचा आहे. यावरून दोघेही अनेकदा ट्रोलही होतात. पण दोघांनाही याची मुळीच पर्वा नाही. मलायका आणि अर्जुन दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. तसेच ते लवकर लग्न करणार असल्याचेही बोलले जात आहे. अर्जुन आणि मलायकाने अगदी उघडपणे आपल्या नात्याची कबुली दिली आहे. त्यामुळे साहजिकच चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागणे स्वाभाविक आहे. मलायकाने आता अंगठी घालून फोटो शेअर केल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Tags: Arjun KapoorBollywood RelationshipInstagram PostMalaika Aroraphotos viral
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group