फिल्म रिव्ह्यू | भट्ट कॅम्प मधल्या दिग्दर्शकाला साजेशी बदला आणि थ्रिलर असलेली ही गोष्ट आहे गोव्यातल्या चार पात्रांची. पाच वर्षांच्या अंतराने यात दोन गोष्टी समांतर घडत जातात. म्हणजेच सस्पेन्स साठी सर्वात भारी फॉरमॅट. दिगदर्शक मोहित सूरी त्याचा पूर्ण फायदा घेत जमतील तेवढे सरप्राईजेस आपल्याला देतो.
चित्रपटाची सुरवात थोडी स्लो होते, पण शेवट गाठेपर्यंत ती वेग पकडते, शेवटी एक मोठा धक्का सुद्धा पटकथाकाराने ठेवला आहे. सारा आणि अद्वैत म्हणजेच दिशा आणि आदित्य हे प्रवासी आहेत, ते गोव्यात हुक्का पार्टी मध्ये एकमेकाना भेटतात, तिथून त्यांचा एकत्र प्रवास सुरु होतो. एक व्हिलन सारखच सारा ची बकेट लिस्ट पूर्ण करायला अद्वैत तिला मदत करायला लागतो. पण अचानक काही अनपेक्षित घटना घडायला लागतात, सारा चा खून होतो, अद्वैत वर ड्रग डीलींगचा आरोप होतो आणि तो पाच वर्षे जेल मध्ये जातो, खरी गोष्ट सुरू होते तो परत आल्यावर. मग हळू हळू त्या खुणा मागे खरं कोण आहे हे शेवटीच कळतं.
अनिल कपूर आपली व्हर्साटीलिटी दाखवत, ड्रग एडिक्त पोलीस निभावताना मनोरंजन करतो. आदित्यला या रुपात बऱ्यापैकी न्याय देऊ शकला आहे. दिशाचं काम दिशाने केलेलं आहे. कुणाल खेमुही चांगला पचतो.
चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आपल्याला गोव्याच्या प्रेमात पाडते, कलर आणि स्लो मोशन सगळंच चांगलं जमलंय. संगीत आणि गणी ठरवण्याची इच्छा जागवतात. अर्थात तुम्ही लिरिक्स सोडून बिट्स ऐकलेत तरच.
थोडक्यात, गोष्ट फिल्मीच आहे, ट्रेलर वरून आपल्याला अंदाज आला होताच. त्याची आपल्या प्रेक्षकांना सवय आहेच. ते डावललं तर गोष्ट हळू हळू आपल्याला अडकवत जाते.
गोव्याचं आणि दिशाचं सौंदर्य अनुभवायला, (आदित्यपण कमी नाहीये) आणि शेवटी गुड फिलिंग वाली स्माईल घेऊन जाण्यासाठी चित्रपट योग्य आहे. सर्वांना बघाच म्हणून सांगण्यासारखा नसला तरी तुमचे या आठवड्यातले दोन तास देण्याइतपत चित्रपट आहे.
रेटिंग – 3.5/5
https://youtu.be/sft5baUuzQs