हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आयुष्यात प्रत्येक गोष्ट सहज मिळाली तर कष्टाची किंमत उरत नाही. त्यामुळे आपल्याला चांगलं, वाईट जे काही मिळत त्यामागे कर्म आणि कष्ट असतात हे टाळून चालणार नाही. कोणतंही कर्म करताना किंवा घडताना माणसाचे चारित्र्य प्रभाव टाकत असते. त्यामुळे चारित्र्य फार महत्वाचे.. हे जपण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर काट्यांमध्येही फुले वेचण्याची तयारी ठेवतात. पण तरीही अनेकदा कृतिपूर्वक वागतानाही चुका घडतात ज्यावरून चारित्र्याला धक्का लागतो. मग लोक म्हणतात, चारित्र्यावर डाग लागला आहे. याच चारित्र्याबद्दल बोलताना मानसी नाईकने एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच व्हायरल होत आहे.
डागाळलेलं चारित्र्य आयुष्यभर यातना देतं आणि त्यामुळे कलाकार मंडळी मनोरंजन विश्वात वावरताना आपल्या कृतींची जाणीवपूर्वक विशेष काळजी घेतात. कारण कलाकारांच्या आयुष्यावर त्यांच्या माणसांशिवाय चाहत्यांची आणि प्रत्येकाचीच बारीक नजर असते. याच चारित्र्याविषयी बोलताना मानसी नाईकने सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मानसीने काळ्या रंगाचा टीशर्ट परिधान केलेला एक फोटो शेयर केला आहे. सोबत ती डायरीमध्ये काहीतरी लिहिताना दिसतेय. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात, सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते, चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते’.
मानसीची हि पोस्ट नेमकी कुणासाठी असेल..? किंवा तिला या पोस्टमधून नक्की काय सांगायचे आहे..? हे सांगणे अवघड असले तरीही या पोस्टचा तिच्या आयुष्याशी काही संबंध नसेलचं असे म्हणता येणार नाही. कारण गेल्या काही महिन्यांपासून मानसी नाईक तिच्या वैवाहिक आयुष्यातील अडचणी, घटस्फोट, करिअर संबंधित चढ उतार यांमध्ये पुरती फसली आहे. पती प्रदीप खरेरासोबत तिने घटस्फोट घेतल्यापासून तिचे चाहते जरी तिला साथ देत असले तरीही काही लोक अशी आहेतच जे तिच्या चारित्र्यावर बोट उचलताना अन तिला ट्रोल करताना दिसत आहेत. त्यामुळे नाव घेतले नसले तरीही हि पोस्ट त्या ट्रोलर्ससाठी असेल असे म्हणायला हरकत नाही.
Discussion about this post