हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत मानसी नाईक हे देखील नाव आवर्जून घेतले जाते. ‘बघतोय रिक्षावाला’ या गाण्याच्या माध्यमातून मानसीने अख्खा महाराष्ट्र नाचवला आहे. अभिनेत्री मानसी नाईक हि अभिनयात उत्तम आहेच शिवाय नृत्य करण्यात तिचे पाय थांबवणं फार कठीण. मानसी सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ती विविध व्हडिईओ आणि फोटो शेअर करताना दिसते. लग्नानंतर तर ती सोशल मीडियावर आणखीच ऍक्टिव्ह झाली आहे. फक्त आता एकटी नाही तर पतीसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. या पोस्टवर तिचे चाहते नेहमीच चांगला प्रतिसाद देतात. यावेळी मानसी आणि तिचा पती प्रदीप एका बीचवर दिसले. यावेळी तिने पतीला उचलून घ्यायचा प्रयत्न केला आणि जे झालं ते तुम्ही फोटोंमध्ये पाहू शकता.
मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा हे ट्रेंडिंग कपलं आहे. यामुळे अनेकदा हे विविध पद्धतीने सोशल मीडियावर झळकत असतात. सध्या सोशल मीडियावर पती पत्नीसाठी खास ट्रेंड चालू आहे. या ट्रेंडमध्ये हे कपलं सहभागी झालं नाही तर कसं बरं चालेल..? मानसीने ‘पिक अप युवर हसबँड’ म्हणजेच तुमच्या नवऱ्याला उचलून घ्या, हे सोशल मीडिया चॅलेंज स्वीकारलं आणि करूनही पाहिलं. मानसीने प्रदीपला उचलून घेण्याचा प्रयत्न केला. पण हे करताना तिने प्रदीपला चक्क दोन वेळा खाली पाडलं. पण पण पण… अखेर तिने हे चॅलेंज पूर्ण करून दाखवलंच. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. यामध्ये ते दोघेही समुद्राच्या काठाशी उभे असल्याचे दिसत आहे.
https://www.instagram.com/p/Cb7tYU7gV1D/?utm_source=ig_web_copy_link
या धमाल चॅलेंजचे फोटो अभिनेत्री मानसी नाईकने अधिकृत सोशल मीडियावर शेअर केले आहे. इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनही लिहिले आहे जे चांगलेच चर्चेत आहे. या फ़ोटोंमध्ये तिने प्रदीपला उचलताना आणि पाडताना दोन्ही फोटो शेअर करतात लिहिले आहे कि, ‘मी दिवसेंदिवस अधिक ताकदवान बनत चालली आहे.’ सध्या मानसीची हि पोस्ट चांगलीच व्हायरल होते आहे आणि मुख्य म्हणजे या फोटोंसह हा ट्रेंड आणखीच जोरात चालू आहे. मानसी आणि प्रदीप यांनी २०२१ मध्ये लग्न केलं आणि ते एकमेकांवरील प्रेम दर्शविण्यासाठी नेहमीच उत्सुक दिसले आहेत.
Discussion about this post