Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसाद नवरा म्हणून तर बेस्ट आहेच पण..; मंजिरी ओकची पतीसाठी खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Prasad_Manjiri Oak
0
SHARES
13
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| कालच्या रविवारी अर्थात १९ जून रोजी संपूर्ण जगात फादर्स डे साजरा केला गेला. मग अश्यात सर्वसामान्य लोकांसह अनेक सेलिब्रिटी देखील उत्साहाने हा दिवस साजरा करत होत्या. हा दिवस वेगळेपणाने साजरा करण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियाचा वापर केला. साहजिक आहे गेल्या काही काळापासून सोशल मीडिया व्यक्त होण्याचा प्लॅटफॉर्म ठरलाय. तर फादर्स डे म्हणून अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. पण फादर्स डे च्या निमित्ताने पतीसाठी खास पोस्ट लिहिणारी मंजिरी ओक एकमेव ठरली. तिने पती प्रसाद ओकसाठी अत्यंत खास अशी पोस्ट लिहीत तो नवरा आणि बाबा अशा दोन्ही भूमिकेत बेस्ट असल्याचं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

या पोस्टमध्ये मंजिरी ओक म्हणतेय की, आमच्या घरातील तीन मुलं म्हणजे मयंक आणि सार्थक ही आमची मुलं अन् मस्कारा हा आमचा कुत्रा या तिघांचीही प्रसाद खूप काळजी घेतो. मयंक आणि सार्थक यांच्या जडणघडणीत प्रसादने बाबा म्हणून जे केलय ते मी जवळून पाहिलं आहे. कधी कधी आई म्हणून् माझ्यापेक्षा जास्त प्रसादने त्यांना घडवण्यात वाटा दिलाय. मुलांना तो खूप छान समजून घेतो. प्रसाद नवरा म्हणून तर बेस्ट आहेच पण वडील म्हणून तो ग्रेट आहे. यासोबत हॅपी फादर्स डे लिहीत चंद्रमुखी चित्रपटातील सवाल जवाब लावणीतील गाण्याच्या दोन ओळी तिने शेअर केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

उमगायाला सोपी आई, बाप कुणाला कळतो गं या ओळींच्या माध्यमातून मंजिरीने प्रसादमधील बाबाचं वर्णन अतिशय मार्मिक अश्या शब्दांमध्ये केले आहे. फादर्स डे निमित्त पतीसाठी केलेली मंजिरीची ही खास पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल देखील झाली आणि सोबत चर्चेत सुद्धा आहे. मंजिरी आणि प्रसाद ही मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. प्रसाद एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक आहे हे तर धर्मवीर आणि चंद्रमुखी या दोन चित्रपटांच्या माध्यमातून समोर आले आहे. तर त्याची पत्नी मंजिरी ओक हिच्या स्वतःच्या नावाने नथीचा ब्रँड आहे. हे जोडपे आदर्श जोडप्यांपैकी एक असून मराठी इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे.

Tags: Fathers DayManjiri OakPrasad OakSocial Media Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group