हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अत्यंत ओळखीचा चेहरा असलेले अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच सापडल्यामुळे मांजरेकर चिंतेत आहेत. या चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अखेर आज मुंबई उच्च न्यायालयाने मांजरेकरांना तात्पुरता दिलासा दिला आहे. “पुढील सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नका”, असं उच्च न्यायालयाने सांगितले आहे.
अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवाकोरा मराठी चित्रपट ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा प्रदर्शनाआधीच वादात सापडण्याचे कारण त्याचा ट्रेलर ठरला आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये लहान मुलांना आक्षेपार्ह स्थितीत दाखवल्यामुळे अनेकांनी चित्रपटाबाबत विरोध दर्शविला होता. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल झाली होती. अखेर हे प्रकरण मुंबई हाय कोर्टात पोहोचले आणि यानंतर कोर्टाने मांजरेकरांना तात्पुरता दिलासा दिला आहे. “पुढची सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नका”, असं उच्च न्यायालयाने म्हटल आहे.
View this post on Instagram
दिवंगत ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर आधारित आहे. ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट १४ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला. याआधी चित्रपटाच्या ट्रेलरमधील आक्षेपार्ह दृश्यामुळे राज्य महिला आयोगाने चित्रपटाचा विरोध करत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली होती. यानंतर तो ट्रेलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढण्यात आला होता. तसेच चित्रपटांतील आक्षेपार्ह दृश्यांनाही कात्री लावल्याचे मांजरेकरांनी सांगितले होते. या चित्रपटात प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मिरा शाह, उमेश जगताप, गणेश यादव, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर आणि ईशा दिवेकर या कलाकारांनी काम केले आहे.
Discussion about this post