Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

माझं नुकसान कोण भरून देणार..?; ‘एअर इंडिया’च्या वाईट सेवेवर अभिनेत्याने व्यक्त केला संताप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 14, 2022
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
216
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेता मनोज जोशी यांना कधी वैतागलेलं, चिडलेलं पाहिलंय का..? नसेल पाहिलं तर या व्हिडिओत पहा. कारण या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत ते खूपच रागात दिसत आहेत. मनोज जोशी यांनी स्वतः हा व्हिडीओ आपल्या ट्वीटरवर शेअर केलाय. ज्यामध्ये ते एअर इंडिया कंपनीच्या सेवेवर वैतागले आहेत. एअर इंडिया कंपनीची सेवा खूपच वाईट आहे आहे आणि त्यांच्याकडे कर्मचारी वर्ग कमी असल्यानं आपला संपूर्ण दिवस वाया गेल्याचे ते यात बोलत आहेत. साधारण ४० ते ४५ मिनिटांपासून आपल्या सामानाची वाट पाहत ते लगेज बेल्टजवळ उभे होते. त्यांचे सामान खूप उशिरा मिळाल्याने त्यांचा वेळ वाया गेला. ज्यामुळे साहजिकच त्यांचा पारा चढला.

.@airindiain flight 634 was late by 3 hours and now i am waiting for baggage to come on belt since last 40 minutes at @CSMIA_Official. There is no staff here to guide or help. I have never faced such worst service till date. They spoiled my entire day. Who will compensate? pic.twitter.com/f5CsNRkoxV

— Manoj Joshi (@actormanojjoshi) October 12, 2022

अभिनेता मनोज जोशी यांनी हा व्हिडीओ मुंबई एअरपोर्टवर लगेज बेल्ट जवळ शूट केलाय. यामध्ये मनोज जोशी बोलताना दिसत आहेत कि, यावेळी अभिनेता मनोज जोशी यांच्या रागाचा पारा इतका प्रचंड होता कि बस्स. जोशींनी आपलं ट्वीट एअर इंडिया आणि छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट यांच्या अधिकृत हॅन्डलला टॅग केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय की, ‘एअर इंडियाच्या फ्लाइट नं ६३४ नं भोपाळहून तब्बल ३ तास उशिरानं उड्डाण केलं आणि आता मुंबईला लगेज बेल्ट जवळ प्रवाशांना तब्बल ४० मिनिटं थांबवलंय.. सामानाच्या प्रतिक्षेत.

Dear Mr. Joshi, thank you for connecting with us. We have informed our concerned team and they will get in assist you at the earliest. Wishing you Goodness Always, Team CSMIA.

— CSMIA (@CSMIA_Official) October 12, 2022

इथे कोणी त्यांचा कर्मचारी देखील नाही जो आम्हाला मार्गदर्शन करेल. मी इतकी वाईट सेवा कुठल्या विमान कंपनीची कधीच अनुभवली नाही. या लोकांनी माझा संपूर्ण दिवस वाया घालवला. माझं हे नुकसान कोण भरून देणार?’ याशिवाय रागारागातच ते म्हणाले कि, एअर इंडिया कधी सुधारणार की नाही?

Dear Mr. Joshi, we're sorry about the wait. Allow us some time to get this checked. Someone from the team will be in touch with you.

— Air India (@airindiain) October 12, 2022

अभिनेता मनोज जोशी यांच्या या व्हिडीओला १ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हा व्हिडीओ अजूनही व्हायरल होतोय. मनोज जोशी यांच्या या ट्वीटवर एअर इंडियाच्या मॅनेजरने काही वेळेपूर्वीच रिप्लाय दिला आहे. एअर इंडियाकडून उत्तर देत असे लिहिले आहे कि, ‘प्रिय मनोज जोशी, आम्हाला आशा आहे आपल्याला सामान मिळालं असेल. तुम्ही निश्चिंत व्हा! आपली तक्रार आम्ही आमच्या एअरपोर्ट टीमपर्यंत पोहचवू. आम्ही याची चौकशी करू. पुढील वेळेस आपल्याला चांगली सेवा मिळेल अशी आम्ही हमी देतो.’

Tags: Air Indiabollywood actorManoj JoshiTwitter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group