हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक हि गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांचा लवकर घटस्फोट होणार असून सध्या याची अधिकृत प्रक्रिया सुरू आहे. तसेच हे दोघेही एकमेकांपासून वेगवेगळे राहत आहेत. अशातच मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय दिसते. आयुष्यातील दुःख एकाबाजूला सारून ती नव्याने आयुष्याची सुरुवात करताना दिसते आहे. विविध पोस्टच्या माध्यमातून मानसी आपल्या भावना व्यक्त करत असते. यावेळी तिचा हटके अंदाज तिने शेअर केलेल्या व्हिडिओत पहायला मिळतो आहे.
अभिनेत्री मानसी नाईक हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे विविध फोटो, लूक, व्हिडीओ, पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. मध्यंतरी पती प्रदीपसोबत चालू असलेल्या वादांमुळे अनेकदा मानसी त्रासलेली आणि दुखावलेली दिसली. विविध पोस्ट शेअर करताना तिच्या मनात सुरु असलेली हुरहूर चाहत्यांपर्यंत पोहोचली. पण आता कुटुंबियांच्या साथीने आणि चाहत्यांच्या प्रेमासह मानसी एका नव्या आयुष्याच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. स्वामींवरील श्रद्धा आणि कामाबाबत असणारी निष्ठा जपत मानसी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा ती सक्षम आणि भक्कम होताना दिसतेय.
नुकताच तिने सोशल मीडियावर बिनधास्त अंदाजात व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने स्काय ब्लु जीन्स, ब्लॅक टॉप आणि डेनिम जॅकेट परिधान केले आहे. तसेच डोळ्यावर गॉगल लावत ती एका संवादावर लिपसिंग करते आहे. तीने यात म्हटलंय कि, ‘तुला तर दिवसा तारे दाखवेन…कुणाच्या बापाला घाबरायचं नाय’. मानसी नाईकचा हा बिंधास्त अंदाज पाहून चाहते भारी खुश झाले आहेत. तसेच चाहते तिच्या या अंदाजाचे समर्थन करत ‘तू भीड आम्ही आहोत’ असे म्हणताना दिसत आहेत. मानसी नाईकने शेअर केलेल्या ‘मी परत आलेय’ या कॅप्शनवरून असेच वाटत आहे कि, ती लवकरच एखाद्या प्रोजेक्टमध्ये एंट्री करताना दिसेल.
Discussion about this post