हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभर कोरोनाचे महाकाय संकट विस्तारलेले आहे. गतवर्षीचा गुढीपाडवा ते यंदाचा गुढीपाडवा हा संपूर्ण कालावधी कोरोनाशी सामना करण्यातच गेला. किंबहुना अजूनही सारेजण या संकटासोबत सामना करीत आहेत. दरम्यान या संसर्गाचा प्रभाव रोखता यावा म्हणून शासनाने लॉक डाऊन लावला होता आणि हातावरचे पोट असणाऱ्या जनसामान्यांचे अतोनात हाल झाले. म्हणूनच यंदाचा गुढीपाडवा अभिजित आणि सुखदाने खास कपडे परिधान करून साजरा केला आहे. त्यांनी केलेली पारंपरिक वेशभूषा साधी सुधी नसून विणकाम आणि भरतकामाशी संबंधित आहे. या फोटोत अभिजीतने परिधान केलेला कुर्ता भरतकाम केलेला मंगलगिरी सुती कुर्ता आहे. तर सुखदाने परिधान केलेली साडी मध्यप्रदेशातील अनुभवी वीणकरांनी वीणलेली संपूर्ण रेशमी माहेश्वरी साडी आहे.
अभिजित खांडकेकरने हा फोटो आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करीत सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच त्याने असे लिहिले आहे कि, गेल्या वर्षभरात सगळ्याच क्षेत्रातल्या सगळ्यांचीच परवड झाली. त्यात प्रामुख्याने भरडले गेले भारतातल्या कानाकोपर्यात वसलेले वीणकर, हातमाग कामगार, आणि भरतकाम करून उपजिविका करणारे शेकडो कलाकार.बदलत्या फ़ैशन ट्रेंड्स मुळे आधीच लोप पावत चाललेल्या ह्या कला, लॉकडाउन च्या काळात नामशेष होतील की काय अशी भिती वाटू लागली आहे. निकायी फ़ैशन स्टुडिओ च्या सहाय्याने ह्या सगळ्या अंधुक प्रकाशात , कुठल्याही ईंधनाशिवाय हातमागावर, हाताने कलाकुसर केलेली अप्रतिम वस्त्र घडवणार्या कलाकारांना प्रकाशझोतात आणण्याचा हा छोटा प्रयत्न. आपल्या वॉर्ड्ररोब मध्ये एका तरी हातमाग वस्त्राचा समावेश करूया आपण केलेली छोटी सुरूवात निश्चित सकारात्मक बदल घडवेलच. येणारं मराठी नवं वर्ष आपणा सर्वांना आरोग्यदायी जावो. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. अभिजीत- भरतकाम केलेला मंगलगिरी सुती कुर्ता. सुखदा- मध्यप्रदेशातल्या अनुभवी वीणकरांनी वीणलेली संपूर्ण रेशमी माहेश्वरी साडी
गतवर्षी या सणाला सारेच अनभिज्ञ होते. मात्र यावेळी सगळ्यांना घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज आहे. त्यामुळे अभिजित आणि त्याची पत्नी सुखदा यांनी हातमाग कामगारांचा सण सुखाचा व्हावा या दृष्टीने एक पाऊल उचलले आहे. यंदाचा गुढीपाडवा त्यांनी विणकाम आणि भरतकाम करून उपजीविका करणाऱ्या कलाकारांसाठी खऱ्या अर्थाने खास आणि आनंदी केला आहे.
Discussion about this post