हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लहानच्या बिंदूत पाहिलेले मोठे स्वप्न साकारायचे असेल तर त्यासाठी लागते जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी. या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हीही स्वतःत दडलेला तो स्पार्क पॉईंट शोधू शकता. हि अशी वाक्य फक्त पुस्तकातच वाचायला छान वाटतात म्हणाऱ्यांना सत्यात उतरलेल्या कथांचा पुरावा लागतो. तर आज आपण अश्या एका हरहुन्नरी कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला तुम्ही त्याच्या नावाने ओळखण्यापूर्वी त्याने भूषविलेल्या पात्राच्या नावाने ओळखू लागलात.
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कौटुंबिक मालिका ‘शुभमंगल ऑनलाइन’मधून चिन्या नामक भूमिकेच्या माध्यमातून ज्याने घराघरात प्रवेश करीत प्रेक्षकांच्या मनाला हात घातला तो अभिनेता ऋषिकेश वांबुरकर आज मेहनतीने एक एक यशाची पायरी चढत आहे. आज प्रेक्षकांचा लाडक्या चिन्या रुपेरी पडद्यापर्यंत झेप घेऊन पोहोचलाय.
मूळ औरंगाबादचा लेक ऋषिकेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातून नाटक आणि अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन गेली बरीच वर्षे मनोरंजन क्षेत्रात आपले नशीब आजमावत होता. विविध एकांकिका स्पर्धा करीत पुढे कॉमेडी बिमेडी, कॉमेडीची बुलेट ट्रेन या कॉमेडी शोसह कौटुंबिक मालिका शुभमंगल ऑनलाईन, अजूनही बरसात आहे, चांदणे शिंपित जाशी या मालिकांच्या माध्यमातून त्याने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये एक ओळख निर्माण केली.
प्रेक्षक आजही ऋषिकेशला त्याच्या शुभमंगल ऑनलाईन मालिकेतील चिन्या या भूमिकेच्या नावाने ओळखतात. यानंतर आता लाडक्या चिन्या ‘A फक्त तूच’ या आगामी मराठी चित्रपटात ‘पक्या’ नामक महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे.
जयदीप फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘A फक्त तूच’ या आगामी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन रंगनाथ बबन पाचंगे करत आहेत. ‘A फक्त तूच’ या चित्रपटात मुख्य नायकाच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय उदगीरकर तर नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री सुरुची आडारकर दिसेल आणि या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करत ऋषिकेश रुपेरी पडद्यावर आपली जादू करायला तयार आहे.
View this post on Instagram
चित्रपटातील ‘पक्या’ या भूमिकेविषयी ऋषिकेशने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि, ‘A फक्त तूच’ या चित्रपटातील पक्या ही भूमिका वाचताना आणि प्रत्यक्ष भूमिका साकारण्याचा हा अतिशय वेगळा अनुभव आहे. दरम्यान दिग्दर्शक आणि कलाकारांमध्ये प्रत्येक दिवशी अनोखं आणि उत्तम ट्युनिंग जुळून आलं आहे.
त्यामुळे या चित्रपटाचा भाग होता आलं याचा फार आनंद वाटत आहे. चित्रपटातील माझ्या लुकवर मी विशेष काम केलंत त्यामुळे आतापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये हा चित्रपट नक्कीच माझ्यासाठी खास आणि वेगळा ठरेल.
Discussion about this post