हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण महाराष्ट्रात ‘त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश’ प्रकरण सध्या चांगलाच धगधगता विषय ठरला आहे. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे स्थानिक मुस्लिम गावकऱ्यांचा संदल सुरू होता आणि यावेळी प्रथेप्रमाणे त्यांनी महादेवाला धूप दाखवला. यावरून वातावरण प्रचंड पेटलं आहे. या प्रकारामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आणि मुस्लिम समाजातील लोकांनी मंदिरात प्रवेश केला म्हणून मंदिराचे शुद्धीकरण केले गेले. एकीकडे हिंदुत्ववादी संघटना, ब्राह्मण महासंघ संतापल्या अवस्थेत असताना दुसरीकडे काही लोकांनी या संघटनांच्या कृत्यावर टीका केली आहे. देशात हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा असताना असा माणसामाणसात द्वेष परसवू नये, असे लोकांचे म्हणणे आहे. आता या प्रकरणावर किरण माने यांनी एक परखड पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे.
प्रधानमंत्री मोदी जी अजमेर शरीफ दरगाह पर चादर नहीं चढ़ाते? तो नाशिक के त्रिम्बकेश्वर मंदिर में सालों से चली आ रही प्रथा जिसमे स्थानीय मुस्लमान मंदिर में लोबान देते है उसपर SIT क्यों?
कट्टरपंथियों द्वारा सत्ता के लिए हिन्दू-मुस्लिम एकता को तोडा जा रहा है।#Nashik #Trimbakeshwar pic.twitter.com/DnE8BplXVt
— Abu Asim Azmi (@AAA_BOSS_) May 18, 2023
हि पोस्ट शेअर करताना किरण माने आणि लिहिलं आहे कि, ”वारी’ ही लै लै लै नादखुळा गोष्ट हाय. खणत गेलं तर मानवतेचा खजिना सापडतो. आपल्या संतांनी असंच ‘टाईमपास’ म्हणून वारी आणि किर्तनपरंपरा सुरू केली नाय. माणसामाणसातले सगळे भेदभाव नष्ट करणारा खतरनाक विद्रोह होता तो. याचं जगात भारी उदाहरण म्हणजे पैठणचा हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा! संत एकनाथांच्या पालखीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या याच दर्ग्यात मुक्कामाला थांबत्यात. तिथले मुस्लिम बांधव सगळ्या वारकऱ्यांची लैच प्रेमानं, उत्साहानं सेवा करत्यात. या मुक्कामात आपले वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पूजत्यात. मुस्लिम बांधवांकडनं आपल्या वारकर्यांना जेवण दिलं जातं. विशेष म्हणजे या काळात ह्या दर्ग्यात नमाज आणि भजन दोन्ही ‘अदा’ होतं! ज्यावेळी मुस्लिम बांधवांच्या नमाजाची वेळ होते त्यावेळी वारकरी आपले भजन थांबवून ब्रेक घेत्यात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी परत भजन कंटिन्यू करत्यात!!’
पुढे लिहिलंय, ‘एरवी सहज दर्शनाला पैठणला गेलेला वारकरी मज़ारीवर माथा टेकूनच येतो. जे मुस्लीम भाविक दर्ग्यात येत्यात, ते एकनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत. संत एकनाथ महाराज आणि हजरत इद्रिस हुसैनी या दोन्ही महामानवांना या सलोख्याच्या वारीतनं आपल्या सगळ्यांना कायतरी ‘मेसेज’ द्यायचाय. तो आपण समजून घेतला पायजे. ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ हा विचार नामदेव, तुकोबारायांपास्नं आपल्या सगळ्या संतांनी अंगीकारला… तीच परंपरा आपल्या आज्ज्या-पणज्यांनी, बापजाद्यांनी जोपासत आपल्यापर्यन्त आणलीय. ती फुकून आपल्या पुढच्या पिढ्यांच्या मनामेंदूत नफरतीचं विष पेरायचं, का आपल्या बापजाद्यांचा वारसा समृद्ध करायचा हे आपलं आपण ठरवायचंय. आपल्या धडावर ‘आपलंच’ डोकं हाय…’. अशाप्रकारे किरण माने यांनी वारी आणि वारकऱ्यांचे उदाहरण देत जात, धर्मावर वाद पेटवू पाहणाऱ्यांचे कान टोचले आहेत.
Discussion about this post