हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय, वादग्रस्त आणि तितकीच रहस्यमय असणारी ‘रात्रीस खेळ चाले’ हि मालिका नेहमीच चर्चेत राहिली आहे. याचे कारण असे कि मालिकेतील पात्रांची बोलीभाषा, कलाकारांनी उमटविलेली पात्रे आणि मालिकेचे चित्रीकरण झालेला नाईकांचा वाडा. या मालिकेतील प्रत्येक गोष्ट नेहमीच चर्चेत राहिली. विशेष म्हणजे मालिकेतील ‘अण्णा नाईक’ चांगलेच गाजले. अभिनेते माधव अभ्यंकर यांनी उमटविलेले पात्र अण्णा नाईक इतके विशेष आहे कि अगदी साताऱ्याचे खासदार उदयन राजे यांनाही या पात्राने भुरळ पाडली आहे. मुख्य म्हणजे त्यांना या पात्राचा अण्णा नाईक असो मी हा डायलॉग प्रचंड आवडतो हे त्यांनी स्वतःच अनेकदा म्हटले आहे. अखेर हि भूमिका वठविणारे माधव अभ्यंकर आणि खासदार उदयनराजे यांची आज भेट घडून येण्याचा योग सुफळ संपूर्ण झालाच.
https://twitter.com/Princy_Vishu/status/1444266859256107013
खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा येथील जलमंदिर पॅलेस या ठिकाणी रात्रीस खेळ चाले फेम अभिनेता माधव अभ्यंकर यांनी सदिच्छा भेट घेतली. खासदार उदयनराजे हे “रात्रीस खेळ चाले” मालिकेतील अण्णा नाईक यांच्या डायलॉगचे चाहते आहेत, हे त्यांनी बऱ्याच वेळा त्यांच्या मुलाखतीत “अण्णा नाईक असो मी” हा डायलॉग बोलून सिद्ध केले आहे. त्यामुळे आता समोर जेव्हा अण्णा नाईक अर्थात माधव अभ्यंकर उभे होते तेव्हा राजेंनी अगदी तोंडभर त्यांच्या अभिनयाचे आणि डायलॉगचे कौतुक केले आहे. इतकेच काय तर तो डायलॉग पुन्हा एकदा बोलून कौतुकाचे बोल काढले आहेत.
यानंतर आपला आनंद व्यक्त करताना अभिनेता माधव अभ्यंकर म्हणाले कि, या भूमिकेबाबत महाराष्ट्रातून खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र, महाराजांना ‘अण्णा नाईक असो मी’ हा डायलॉग आवडतो हे ऐकून धन्य झालो. माझी पत्नी देखील उदयनराजे भोसले यांची चाहती आहे. लवकरच आम्ही एकत्र महाराजांची भेट घेऊ. खरंतर मला केव्हापासून महाराजांना भेटण्याची इच्छा होती. पण योग येत नव्हता. आज अचानक मित्रवर्य मेघराज राजेंची भेट झाली आणि ते म्हणाले की चला महाराजांना भेटायला जाऊ. मी म्हणालो देखील की, नको तिथे गर्दी असेल, आपण नंतर जाऊ. पण त्यांनी हट्ट केला आणि आमची भेट झाली.
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचे तिसरे पर्व दणक्यात सुरु आहे. जसा प्रत्येक घराण्याला एक इतिहास असतो आणि कोणी तो शोधतो तर कोणी नाही. पण इतिहास त्या त्या घराण्याच्या मुळाशी असतो. एका पुरुषापासून पुढची वंशवेल ज्याला आपण पीढी म्हणतो ती वाढते. अशा अनेक पिढ्या त्या घराण्याच्या वंशज क्रूरकर्मा निपजतात ते हि त्यांच्या नकळत. अनेकदा पूर्वजांनी नेमून दिलेले कुळाचार पायदळी तुडवल्याने आणि स्वार्थासाठी पुण्याची कास सोडून पाप प्रवृत्त होणे. यामुळे हातून खून, व्यभिचार, व्यसन असली पापं घडत जातात. पण त्याचे भोग त्याच्या सर्व कुटुंबाला भोगावे लागतात. अशीच हि एक कथा.. एका नाईक घराण्याची.. जिला “रात्रीस खेळ चाले” म्हणून आपण ओळखता.
Discussion about this post