हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोना नियमावलीचे पालन करून लोकांनी आपापल्या घरात हा सोहळा साजरा केला. अनेको बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आपल्या चाहत्यांना या सणाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. दरम्यान ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनीदेखील हेही फेसबुकवरून आपल्या चाहत्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्यांच्या शुभेच्छा चाहत्यांनाच काय तर इतर अनेक नेटकऱ्यांना किंचतही रूचल्या नाहीत आणि मग काय, लोकांनी त्यांना जबरदस्त ट्रोल केले.
त्याच झालं असं कि, फेसबुकवर कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना सचिन पिळगांवकर यांनी एक उर्दू शेर शेअर केला होता. ‘अगर किशन की तालीम आम हो जाए, तो काम फितनागरों का तमाम हो जाए…,’ हा मौलाना जफर अली खान यांनी शेअर केला. याचसोबत जन्माष्टमी मुबारक हो.., असेही त्यांनी लिहिले. ही पोस्ट पाहून अनेकांनी सचिन यांच्या पोस्टपेक्षा त्यांच्या उर्दूवर आपले लक्ष्य केंद्रित केले आणि बरोबर निशाणा साधत त्यांना ट्रोल केले आहे. गोकुळाष्टमी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी, हिंदी, संस्कृत असे विविध भाषांचे पर्याय असताना उर्दुचाच आग्रह का? अशा आशयाचा सवाल नेटकऱ्यांनी सचिन याना सोशल मीडियावर विचारला.
सचिन यांच्या पोस्टवर एका फेसबुक युजरने लिहिले कि, भगवद्गीतेत ६०० पेक्षा अधिक श्लोक आहेत. तुम्ही ‘कट्यार’मध्ये मुस्लिम गायकाची भुमिका केलीत, त्या भुमिकेतून बाहेर या आणि कुणाचेही दाखले देऊ नका. याशिवाय येण्या एका युजरने लिहिताने म्हटले कि, श्रीकृष्णाने अख्खी गीता संस्कृतमध्ये सांगितली, त्याच श्रीकृष्णाच्या जन्म तिथीच्या शुभेच्छा उर्दू भाषेत देत आहात? काही विचार करून तरी शुभेच्छा द्यायच्या. हि पोस्ट पाहून संतापलेल्या नेटकऱ्यांनी सचिन यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना, ‘तुमच्याकडून हीच नकली धर्मनिरपेक्षता अपेक्षित होती’ असे खाद्य शब्दांत सुनावले आहे. एका युजरने तर ‘अहो सचिन, तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलात, मराठीचा वापर करा’, असा सल्ला एकाने त्यांना दिला. इतकंच काय तर अर्वाच्य कमेंट्स देखील या पोस्टवर पाहायला मिळत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि, कट्यार नक्की काळजात घुसली की मेंदूत. अश्या प्रकारे सचिन पिळगांवकर ट्रोलर्सच्या निशाण्यावर असल्याचे पाहायला मिळाले.
Discussion about this post