हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तू म्हणशील तसं’ या नाटकात मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री भक्ती देसाई प्रमुख भूमिकेत आहेत. तर अमोल कुलकर्णी, प्रिया करमरकर या कलाकारांचादेखील यात विशेष समावेश आहे. या नाटकाचे लेखन संकर्षण कऱ्हाडे यानेच केले आहे. तर प्रसाद ओकने याचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकाचे नैपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी केले असून अशोक पत्की यांनी नाटकाला संगीत दिले आहे. इतकेच नव्हे तर, प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन, गौरी थिएटर्स यांनी या नाटकाची निर्मिती केलेली आहे. नाट्यगृहे बंद असल्याने प्रेक्षकांना चांगल्या दर्जाची नाटकं पाहता आली नाहीत पण आता रंगभूमीवर वेगवेगळ्या धाटणीची नाटकं प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाली आहेत.
सध्या तब्बल दीड वर्षानंतर राज्यभरातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सरकारच्या परवानगीने सुरु होताना दिसत आहेत. यानंतर आता पुन्हा एकदा तिसरी घंटा ऐकू येणार याचा आनंदच काही वेगळा आहे. दरम्यान ‘तू म्हणशील तसं’ हे जबरदस्त नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला सज्ज झालं आहे. या दसऱ्याला या नाटकाच्या प्रयोगाच्या पुढील तारखा जाहीर झाल्या आहेत.
दरम्यान २३ ऑक्टोबर २०२१ रोजी शनिवारी दुपारी ४.३०वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. तर २१ ऑक्टोबर २०११ रोजी दुपारी ४:३० वाजता ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात याच नाटकाचा दुसरा प्रयोग रंगणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
तू म्हणशील तस या नाटकाचा लेखक आणि मुख्य पात्र निभावणारा संकर्षण कऱ्हाडे मात्र चांगलाच पेचात अडकला आहे. कारण झी मराठीवरील नुकतीच सुरु झालेली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकणारी मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत तो समीर नावाचे पात्र साकारत आहे. त्याच्या त्या पात्राला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत असताना आता तू म्हणशील तस या नाटकाच्या प्रयोगांमुळे त्याला मालिकेपासून दूर जावे लागणार आहे.
या मालिकेत प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे आणि संकर्षण कऱ्हाडे तसेच मालिकेतील परी अर्थात मायरा सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. पण नाट्यगृहांचा पडदा आता पुन्हा उघडणार त्यामुळे संकर्षण मालिका सोडणार अशी भलतीच चर्चा रंगली आहे. पण यावर मात्र अद्याप संकर्षणने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Discussion about this post