हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा मराठी सिनेसृष्टीवर पडत असलेल्या प्रभावामुळे कित्येक कलाकार आपापल्या घरी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. अश्यावेळी आपल्या प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया व्यतिरिक्त आणखी चांगला आणि सोप्पं पर्याय तरी काय असेल? त्यामुळे जवळ जवळ सगळेच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्याचप्रमाणे मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेसुद्धा सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह आहे आहे. दरम्यान घरी बसून काय करायचं असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असताना संकर्षण मात्र मस्त कविता लिहीत आहे. अशीच एक कविता त्याने नुकतीच आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. या कवितेचे शीर्षक त्याने वॉट्सअँप फुकट संस्था असे दिले आहे.
परत एकदा लॉकडाऊन हा विषय सुरु झाला आहे. त्यामुळे परत एकदा वेळ मिळायला सुरुवात झालीये. त्यामुळे काही लिहिण्याचा प्रयत्न केलाय तो तुमच्यासमोर सादर करतो. याला आपण कविता म्हणू शकतो किंबहुना कविताच म्हणूया, असे म्हणत संकर्षणने या व्हिडिओची सुरुवात केली आहे. तर कवितेचा संदर्भ देत तो म्हणतोय कि, यावेळेसचा विषय जरा खास आहे, घराघरातला आहे, खरतर घराघरातला नाही हाताहातातला आहे. आपण सर्वजण या फुकट संस्थेवर आहोत या फुकट संस्थेचा लाभ घेतोय. या कवितेत संकर्षण वॉट्सअँप ला फुकट संस्था असे संबोधतो आहे. त्यामुळे या कवितेची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. संकर्षण चे चाहते यावर भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत.
संकर्षण कऱ्हाडे हा नुसता नातं नसून एक उत्तम लेखक, कवी आहे. आतापर्यंत त्याने केलेल्या कवितांचा दर्जा हा नेहमीच अव्वल राहिला आहे. त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या लेखणीची ताकद त्याचे प्रेक्षक धरून ठेवते. त्याच्या लेखनाचे अनेको चाहते आहे. सध्या त्याने शेअर केलेल्या कवितेवर अनेकांनी सुंदर अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जीवनातील खऱ्या खुऱ्या प्रसंगांना शब्दबद्ध करून प्रेक्षकांसमोर मांडण्यात संकर्षणचा हात धरणे अवघडच, असे म्हणायला हरकत नाही.
Discussion about this post