हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत परखड आणि हिंदुत्ववादी विचारधारणा असलेले प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या टोकदार वक्तव्यांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होते. विविध वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतांच्या परखड मांडणीमुळे शरद पोंक्षे काहीही बोलले कि सहज लक्ष वेधलं जात. आजचं युग सोशल मीडियाच्या आधीन झालं आहे आणि म्हणून अनेकदा ते आपले विचार सोशल मीडियाच्या विविध माध्यमांमधून व्यक्त करताना दिसतात. अशीच एक त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी हिंदूंची भीती वाटत असल्याचे म्हटले आहे.
अभिनेते शरद पोंक्षे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे कि, ‘मला मुसलमानांची भीती वाटत नाही.. इंग्रजांची भीती वाटत नाही.. हिंदूंची भीती वाटते, हिंदूंनीच आज हिंदुत्वाशी वैर सुरु केले आहे’. हे विधान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहे. शरद पोंक्षे नेहमीच आपल्या व्याख्यानातून राष्ट्रप्रेमावर भाष्य करतात. ज्यामध्ये हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील सखोल अभ्यास दिसून येतो. ते नेहमीच सावरकरांचे विचार पुढील पिढीकडे पोहचवताना दिसतात. यावरून त्यांची सावरकरांवर असलेली निष्ठा दिसते.
समाजमाध्यमांवर निर्भीडपणे व्यक्त होणारे फार कमीच आहेत आणि त्यांपैकी एक शरद पोंक्षे आहेत. यामुळे त्यांनी शेअर केलेली प्रत्येक पोस्ट चर्चेचा विषय ठरते. आजही त्यांची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने पोंक्षेंची बाजू स्पष्ट करताना लिहिले आहे कि, ‘हे सावरकरांचे विचार आहेत, एका वाक्यात 10000 वाक्यांचा अर्थ दडलेला असतो त्यांच्या लिखाणात…… आणि काही उपट सुंब आणि घुटण्यात मेंदू घेऊन फिरणारे लोकं शरद पोंक्षेना troll करतात….त्यांच्या मंद बुद्धीची कीव करावी तेवढी कमीच’. तर अनेकांनी शरद पोंक्षे यांना ट्रोल करण्यातच धन्यता मानली आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, शरद पोंक्षे यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ते झी मराठीवरील ‘दार उघड बये’ या कार्यक्रमात रावसाहेब हे पात्र साकारत आहेत. तर स्टार प्रवाहावरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत विनायक कानिटकर हि भूमिका साकारत आहेत. मुख्य म्हणजे या दोन्ही भूमिकांना प्रेक्षकांच्या पसंतीची साथ मिळते आहे.
Discussion about this post