हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट या ना त्या कारणामुळे चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे आधीच या चित्रपटावर अनेकांचे लक्ष होते. यामध्ये १९९० साली काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि नरसंहार जगासमोर आणण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी वेगवेगळे मतप्रवाह दिसून आले. दरम्यान अनेक कलाकारांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात आता मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी या चित्रपटाच्या विषयावरून एक पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. जी चांगलीच चर्चेत आहे.
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून हि पोस्ट शेअर केली आहे/ फेसबुक हँडलवर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले आहे कि, ‘ज्या ज्या भागांत हिंदू अल्पसंख्य होतील, तिथे तिथे काश्मीर फाईल्स तयार होईल. हे लक्षात ठेवा,’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी बेधडकपणे केली आहे. अगदी काहीच तासांपूर्वी केलेली हि पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. तर अनेक नेटकऱ्यांकडून या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. दरम्यान कमेंट बॉक्समध्येदेखील दोन गट पडले आहेत. काहींनी शरद पोंक्षेंच्या या पोस्टचं समर्थन केलं तर काहींनी विरोध करीत आपल्याला हि पोस्ट न पटल्याचे म्हटले आहे.
यातील एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘ही जी तुम्ही शक्यता वर्तवत आहात यात काही जगावेगळं तुम्ही सांगत नाही आहात. जिथे हिंदू अल्पसंख्याक होतील तिथे काश्मीर फाईल्स तयार होईल म्हणे. मग जिथे जिथे हिंदू बहुसंख्यांक आहेत आणि इतर जाती समूह अल्पसंख्याक आहेत, त्यांचं काय? मग अशा किती फाईल्स घडल्या आहेत याचा हिशोब करत बसायचा का त्यांनी,’ अशा प्रकारे अनेक कमेंट्समधून विविध शंका आणि सवाल उपस्थित केले आहे. तर एकाने लिहिले कि, ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा हिंदू- मुस्लिम वादावर हिंदूंची बाजू मांडणारा किंवा मुस्लिमांच्या विरोधात बोलणारा नाहीये. तो फुटीरतावादी, दहशतवादी विरुद्ध हिंदू असा आहे. त्यामुळे या फिल्मच्या बाजूच्या आणि विरोधातल्या दोन्ही लोकांनी त्याची अशी मांडणी करू नका.
Discussion about this post