Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आहा..क्या बात है!! मराठमोळ्या बैठकीच्या लावणीवर वैभव तत्ववादीची अदाकारी; VIDEO पाहून नेटकरी झाले थक्क

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 3, 2023
in Trending, TV Show, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vaibhav Tattwavadi
0
SHARES
300
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आगामी मराठी चित्रपट ‘सर्किट’ची तुफान चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे हि नवीकोरी फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे सध्या प्रमोशन सुरु असून चित्रपटाची संपूर्ण टीम विविध कार्यक्रमात, शोमध्ये सहभागी होताना दिसत आहे. नुकतेच स्टार प्रवाह वरील ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमात ‘सर्किट’ची टीम सहभागी झाली होती आणि यावेळी अभिनेता वैभव तत्ववादीने लावणी सादर करत सगळ्यांना चकित करून टाकलं.

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

मराठी मनोरंजन विश्वात एक अत्यंत हरहुन्नरी अभिनेता म्हणून वैभव तत्ववादीकडे पाहिलं जातं. हँडसम आणि मिस्टर परफेक्ट वैभव तत्ववादीचा चाहतावर्ग फार मोठा आहे. फक्त मराठीच नव्हे तर त्याने बॉलीवुडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्याचा ‘सर्किट’ हा आगामी मराठी चित्रपट येत्या ७ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या निमित्ताने वैभव विविध ठिकाणी प्रमोशनसाठी हजेरी लावत आहे. नुकतीच त्याने ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमात लावणी सादर करून चार चाँद लावले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

यावेळी वैभवने आपली अदाकारी दाखवत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नजरेचा करारा बाण आणि त्याच्या देहबोलीची लचक पाहून भल्या भल्या नृत्यांगना लाजतील अशी लावणी त्याने सादर केली. या कार्यक्रमातील स्पर्धक श्रीमयी सूर्यवंशीने ‘राजसा जवळी जरा बसा..’ ही लोकप्रिय लावणी सादर केली. मग तिच्या सादरीकरणानंतर वैभवसुद्धा तिच्यासोबत बैठक घालून बसला आणि लावणीवर थीरकला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी वैभवचे कौतुक करत आहेत. शिवाय यावेळी वैभवची लावणी पाहून कार्यक्रमाची परीक्षक फुलवा खामकरने त्याला काजळाची तिठ लावली आणि म्हटलं, ‘ विभाग एक पुरुष असून काय लावणी नाचला हे सर्वांनी बघा..’.

Tags: Instagram PostMi honar superstarstar pravahVaibhav TatwawadiViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group