हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिचे वडील माधव लिमये यांचे गुरुवारी निधन झाले आहे. भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बाबांसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. सोबत ‘रेस्ट इन पीस बाबा’ असे कॅप्शन दिले आहे. भाग्यश्रीच्या या भावुक पोस्टवर पोस्टवर मराठी इंडस्ट्री आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे आणि तिला धीर दिला आहे. सुबोध भावे, सुव्रत जोशी, स्पृहा जोशी, शंशाक केतकर आणि श्रुती मराठेसह अनेक कलाकारांनी भाग्यश्रीला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, भाग्यश्रीच्या वडिलांवर सोलापूर येथे उपचार सुरु होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. भाग्यश्री नेहमीच तिच्या आई-वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. या फोटोमधून तिच्या पालकांसोबत तिचे असलेले इमोशनल पण स्ट्रॉंग असे बॉडिंग कायम दिसते. शूटिंग शेड्युलमधून सुद्धा नेहमीच ती तिच्या पालकांसाठी वेगळा असा राखीव वेळ काढत असे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट केलेल्या फोटोजवरून तिचे तिच्या आई वडिलांवर किती प्रेम आहे ते दिसते.
भाग्यश्रीने २०१७ साली कलर्स मराठीवरील ‘घाडगे अँण्ड सून’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेशी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या मालिकेत तिने साकारलेली अमृता प्रभुणे हि भूमिका चांगलीच गाजली. अभिनय श्रेत्रात येण्यापूर्वी भाग्यश्री एका आयटी कंपनीमध्ये जॉब करत होती. भाग्यश्रीने अनके जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे.
Discussion about this post