हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नवरात्र म्हणजे नक्की काय? तर नवरात्र म्हणजे शक्ती स्वरूपाची मनोभावे पूजा अर्चना करणे. स्त्री शक्तीचा जागर करणे. या निमित्ताने दरवर्षी अभिनेत्री एक अनोखे फोटोशूट करताना दिसतात. या दिवसांत वेगवेगळ्या देवींचे रूप साकारत त्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. गतवर्षी कोरोना काळात कोरोना योद्धांचा सन्मान करणारे आणि संदेशपुर्वक फोटोशूट तेजस्विनी पंडित या अभिनेत्रीने केले होते. यानंतर यंदा अभिनेत्री अपूर्व नेमळेकर हिने खास नारीशक्तीचा जागर करणारे फोटोशूट केले आहे. कालच्या पहिल्या दिवशी तिने आई अंबाबाईचे स्वरूप धारण केले होते तर आज तिने मुंबापुरीची आई मुंबादेवीचे दर्शन चाहत्यांना घडविले आहे.
अपूर्वाने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘नवरात्रीचा पहिला दिवस, रंग- पिवळा, देवी महालक्ष्मी (अंबाबाई). कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो. कोल्हापूर देवी महालक्ष्मी व अंबाबाई म्हणून ओळखली जाते. मी अणि माझ्या टीमने केलेला ऐक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!’
तर आजचा दुसरा दिवस म्हणजचे दुसरी माळ म्हणूनच अपूर्वाने तिचा दुसरा लूक शेअर केला आहे. यात तिने मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवीच्या रुपातला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन लिहिले कि, नवरात्रीचा दुसरा दिवस ! रंग – हिरवा ! देवी- मुंबादेवी, मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी मंदिर सहा शतके जुने आहे. मुंबादेवी या देवीच्या नावावरुन शहराला मुंबई हे नाव पडले. मंदिराची स्थापना सर्वात आधी मूळ मुंबईकर असलेल्या मच्छीमारांनी (कोळी बांधव) केली. मुंबादेवी, सर्व संकटात मुंबईचे रक्षण करते अशी भावना आहे. मी अणि माझ्या टीमने केलेला ऐक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
अपूर्वाचे हे फोटोशूट पाहून चाहता वर्ग अगदी घरच्या घरी देवीच्या विविध स्वरूपाचे अनोख्या अंदाजात दर्शन घेत आहेत. तयामुळे तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या अनेको सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Discussion about this post