Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हॅपी बर्थडे हेमा! वाढत्या वयाला मागे टाकणाऱ्या कवीचा 42’वा वाढदिवस

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 26, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hemangi Kavi
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्षेत्र कोणतही असो.. आपला आवाज असलाच पाहिजे असं धडाडीचं व्यक्तिमत्व असणारी अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच चर्चेत असते. कधी ह्याला बोलली, कधी त्याला बोलली यापेक्षा ती विविध विषयांवर बेधडक बोलणं पसंत करते. पण तरीही अनेकदा ट्रोल होताना दिसते. हेमांगीची लाईफ स्टाईल अगदी सर्वसामान्य असली तरीही हटके आहे. आज हेमांगी वयाच्या ४२ व्या वर्षात असूनही दिसते सुंदर, नाचते सुंदर आणि अभिनय..? तोही कमालीचा. अशा या बोल्ड, बिंधास्त आणि ब्युटीफुल कवीचा आज वाढदिवस आहे. यामुळे सोशल मीडियावर तिचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

आपलं वय लपविण्यासाठी सगळ्याच अभिनेत्री धडपडत असतात. प्रत्येक अभिनेत्रीचा आपला असं एक वेगळा फिटनेस मंत्रा असतो. फिगर, कलर सगळं कसं परफेक्ट असावं म्हणून या अभिनेत्री काय काय करतात. कधी किलोभर मेकअप, तर कधी वेगवेगळ्या महागड्या स्किन ट्रीटमेंट.. सगळं करतील पण खरं वय सांगणार नाहीत. पण हेमांगी म्हणजे कहर आहे.. वयाचा ताप तिने कधीच घेतला नाही. उलट ती उघडपणे सांगते कि माझी चाळीशी उलटली आहे पण मी आहे तिसावळी…

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

दिलखुलास आणि खुशमिसाज अंदाज असणारी अभिनेत्री हेमांगी कवी आज स्वतःचा ४२वा वाढदिवस साजरा करतेय. दरम्यान तिचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेतच. पण ती स्वतःसुद्धा काही मागे नाही. तर हेमांगीने आज स्वतःच्या वाढदिवशी एक पोस्ट करत स्वतःच खरंखुरं वय सांगून स्वतःलाच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

तिने सोशल मीडियावर आपला फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘हॅपी ४२ टु मी.’ यावरून आपण ४२ वर्षाचे आहोत याची तिला खंत किंवा दुःख अजिबात नाही. तर उलट तिला या गोष्टीचा आनंद आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

तिच्या या बिंधास्तपणामुळेच तिच्यावर चाहते नेहमी खुश असतात. या पोस्टवर अनेक चाहते आणि नेटकरी हेमांगीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. फक्त चाहते, नेटकरीच नव्हे तरमनोरंजन क्षेत्रातील विविध कलाकरांनीदेखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाली कुलकर्णी, ऋतुजा देशमुख, संदीप पाठक, हृता दुर्गुळे, अक्षय नाईक, यशोमन आपटे यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

अभिनेत्री हेमांगी कवी जितकी सुंदर अभिनेत्री आहे तितकीच सुंदर नृत्यांगना देखील आहे आणि याशिवाय ती एक भन्नाट कॉमिक अभिनेत्री आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

त्यामुळे दिवस कोणताही आणि काहीही असो हेमांगी, तिच्या अदा आणि तिची भन्नाट कॉमेडी सुरूच असते. अश्या या सुंदर, बोल्ड, विचारी, परखड आणि बेधडक अभिनेत्रीला वाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा!

Tags: Birthday Special PostHemangi KaviInstagram PostMarathi Actressviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group