हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हि अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ती तिचे फोटो, मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर वारंवार शेअर करत असते. तसेच तिच्या फॅन्ससोबत संवाददेखील साधत असते. तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर एका बाईने कमेंटमध्ये एवढी गचाळ का राहतेस? असा प्रश्न विचारला आहे. हेमांगीने या कमेंटचा स्क्रीनशॉर्ट आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केला असून त्याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचीच चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे.
या बाईने तिच्या कमेंटमध्ये लिहिले होते की, एक्सप्रेशन, डान्स वगैरे ठिक आहे… पण एवढी गचाळ का राहातेस… जरा टापटीप राहा म्हणजे आम्हाला बघावेल हा व्हिडिओ… प्लीज. या कमेंटवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा याचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करीत प्रतिक्रिया देण्याचा हेमांगीचा निर्णय योग्य ठरला. कारण कित्येकदा सोशल मीडियाचा वापर हा कुणाच्या वैयक्तिक बाबींची खिल्ली उडविण्यासाठी केला जात असल्याचे वारंवार आढळून येत आहे. मात्र काही जागरूक नेटिझन्स देखील सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते अश्या गोष्टींना विरोध दर्शविताना दिसतात. तसेच या बाईचे बोलणे अतिशय चुकीचे असल्याचे हे नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत आणि या चुकीच्या गोष्टीला लोकांसमोर आणून दिल्याबद्दल तिचे आभार मानत आहेत.
हेमांगीने या कमेंटचा फोटो शेअर करीत लिहिले कि, या फोटोतली comment वाचा! ती ही एका स्त्री ने लिहिलीये! शिकलेली, बऱ्या घरातली बाई! नक्की कुठे चाललोय आपण? आता या कमेंट्सचा भडीमार होणार… ignore it, social media आहे हे, लोकं बोलणारच वगैरे वगैरे! मला एवढंच लक्षात आणून द्यायचंय की आपली मानसिकता काय होत चाललीये! ती जर चूक असले तर ती थांबवावी की नाही हे ज्याने त्याने ठरवावे!
Discussion about this post