Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड करतेय ‘लॉकडाउन लग्न’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 15, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prajakta Gaikwad
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मराठी मालिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील इतर पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्र अतिशय लोकप्रिय ठरले होते. या मालिकेत येसूबाईंच्या भूमिकेमूळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहचली होती. त्यानंतर आई माझी काळूबाई या मालिकेविषयी उठलेल्या वादांमुळे ती नुकतीच अतिशय चर्चेत होती. मात्र यावेळी ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ती चक्क लॉकडाऊन लग्न करतेय. अहो..खऱ्या आयुष्यात नव्हे.. रुपेरी पडद्यावर..

https://www.instagram.com/p/CO2gMUXsdpG/?utm_source=ig_web_copy_link

होय.. छोट्या पडद्यावर यश प्राप्त केल्यानंतर आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड रुपेरी पडद्यावर झळकण्याची सज्ज झाली आहे. ‘लॉकडाउन लग्न’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे. या चित्रपटाचे अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. याबाबत तिने इंस्टाग्रामवर सांगितले आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, गणपती बाप्पा मोरया.. १४ मे रोजी अक्षय तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त….छत्रपती संभाजी महाराज जयंती…. याच शुभमुहूर्तावर माझ्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात.. तसेच पुढे तिने एक फोटो शेअर करत लिहिले की, नवीन प्रोजेक्ट, नवीन चित्रपट ‘लॉकडाउन लग्न’. नवीन सुरूवात.

https://www.instagram.com/p/CO2W5j0nDa7/?utm_source=ig_web_copy_link

‘लॉकडाउन लग्न’ या आगामी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन सुमीत संघमित्रा करणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती किरण कुमावत, स्वाती खोपकर, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक हे दिग्गज एकत्र येऊन करत आहेत. तर निनाद बत्तीन व तरबेज पटेल हि जोडी सहनिर्मिती करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात लंडनमध्ये होणार आहे.

https://www.instagram.com/p/CO2skDsHpwE/?utm_source=ig_web_copy_link

प्राजक्ताने नांदा सौख्यभरे या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर ती स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत येसूबाईंच्या भूमिकेत झळकली. तसेच तिने आई माझी काळूबाई या मालिकेत देखील मुख्य भूमिकेत काम केले आहे. मात्र काही दिवसांनी निर्मात्यांसह झालेल्या वादविवादांमुळे ती या मालिकेतून बाहेर पडली.

Tags: director sumit sanghmitraLockdown Lagn upcoming filmMarathi ActressPrajakta GaikwadSwarajya rakshak sambhaji fame
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group