हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। खूप कमी काळात लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारी अभिनेत्री म्हणजे ‘फॅन्ड्री’ या गाजलेल्या चित्रपटातील शालू अर्थात राजेश्वरी खरात. राजेश्वरीने नागराज मंजुळे यांची अप्रतिम कलाकृती मानल्या जाणाऱ्या फॅन्ड्री चित्रपटात शालू नामक भूमिका साकारली आणि लोकांनीही तिला शालू म्हणूनच खूप प्रेम दिले. इतकेच काय तर आजही तिला शालू म्हणून लोक ओळखतात आणि तितकेच प्रेम करतात. राजेश्वरी चित्रपटात भले साधी भोळी शालू होती पण खऱ्या खुऱ्या आयुष्यात मात्र राजेश्वरीचा नाद करायचा नाही. कारण रिअल लाईफमध्ये राजेश्वरीचा अंदाज थोडा हटके आणि बोल्ड आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या अंदाजाची झलक दाखविताना दिसते. अनेक लोक तिच्या फोटो आणि व्हिडिओवर प्रचंड कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात तर अनेक लोक मात्र तिला ट्रोल कारण्याची एकही संधी सोडत नाहीत. याहीवेळी असच काहीस झालं पण शालूने मात्र ट्रोलर्सला चांगलेच भिरकावले आहे.
राजेश्वरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसह शेअर करताना दिसते. असाच एक व्हिडीओ राजेश्वरीने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप आणि शॉट्स परिधान केला आहे व ती ‘गिला गिला गिला दिल गिला गिला’ या गाण्यावर थिरकताना दिसतेय. तर काही पुरुष नेटकऱ्यांनी तिच्या कपड्यांवर कमेंट करीत म्हटले कि, पूरग्रस्तांसाठी काय केले? हि नुसती शॉर्ट्स घालून नाचतेय.. या अश्या कमेंट्स पाहून कुणालाही संताप येणे अत्यंत साहजिक होते. मग काय? शालुनेही जबरदस्त बॅटिंग करीत असं काही उत्तर दिल कि, ट्रोलर्सची बत्तीच गुल्ल झाली असेल यात काही शंकाच नाही.
राजेश्वरीने या व्हिडिओवर कमेंट बॉक्समध्ये लिहिले कि, ‘अरे यार, मी काय म्हणतेय…तुम्ही सर्वजण माझ्यावर एवढे प्रेम करता माझ्या सर्व पोस्ट तुम्हा सर्वांमुळे चर्चेत येतात, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे खरच मनापासून आभार मानते. आणि फक्त एवढेच सांगते की, मला ट्रोल झाल्याने काही एक फरक पडत नाही मित्रांनो. फक्त एवढाच जोर असेल, पुरुषत्व (मर्दानगी) दाखवायची जास्तच हौस असेल तर एका मुलीच्या कमेंट बॉक्स मध्ये दाखवण्यापेक्षा तुमच्या नेत्या समोर दाखवा. मला बोलता ना, पूरग्रस्तांसाठी काही केले का, की फक्तं शॉर्ट्स घालून नाचतेय .. अरे मूर्खांनो, या सर्व कामांसाठी सरकार प्रशासन जबाबदार आहे, तुम्ही ज्याला निवडून दिले तो सो कॉल्ड साहेब, नेता जबाबदार आहे मी नाही. तेथे गार पडता म्हणुन कोणालाही जोर दाखवायचा ??? मी मान्य करते की सर्वांनी मदतीचा हात दिला पाहिजे परंतु आपण जो टॅक्स भरतो ना, त्याचा जाब विचारायला पण शिका नाहीतर आहेच़ माझ्या कमेंट बॉक्स जागा.. Always Welcome… आता हे असं सणसणीत उत्तर मिळाल्यानंतर बहुतेक ट्रोलर्ससुद्धा हजारवेळा शालूच्या वाकड्यात जायचा विचार करतील, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
Discussion about this post