हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका आणि सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा विविध लूकमधील फोटोशूट, तसेच व्हिडीओ शेअर करून ती नेटकऱ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिचं एक फोटोशूट व्हायरल होत आहे. या फोटोशूटमधील तिचा बॉल्ड, ब्युटीफुल आणि ग्लॅमरस अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.
अभिनेत्री ऋतुजा बागवेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हे फोटोशूट शेअर केलं आहे. या फोटोमध्ये ऋतुजाने रेड वाईन कलरचा लॉन्ग गाऊन परिधान केला आहे. ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिच्या स्टाईल, आऊटफिट आणि ग्लॅमरस लूकची वाहवाह केली आहे. ‘किती सुंदर…’, ‘ओह मराठमोळं ग्लॅमर..’, ‘फारच मोहक…’ अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
इतकेच नाही तर एकाने लिहिलंय, ‘सोशल मीडियावर तूच वातावरण तापवलं आहेस’. तर आणखी एकाने म्हटले, ‘आधीच उन्हाळा.. त्यात तुझा हॉटनेस.. नुसता जाळ….’ तसेच अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘एव्हढं काय भारी दिसायचं…’ . आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘बॉलिवूडच्या हिरोईनी तुझ्यासमोर फिक्या पडतील..’ याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी हार्ट इमोजी, फायर ईमोजी शेअर करत ऋतुजाच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
Discussion about this post