हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिचा स्वतःचा मोठा एक चाहता वर्ग आहे. विशेष म्हणजे तिच्या चाहत्यांमध्ये प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. एक उत्तम अभिनेत्री आणि तितकीच संवेदनशील कवयित्री.. इतकेच नव्हे तर तर एक कमालीची सूत्रसंचालिका म्हणून स्पृहा जोशीची विशेष ख्याती आहे. सध्या स्पृहा तिच्या ‘लोकमान्य’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. अशातच तिने एक पोस्ट शेअर करत अभिनय क्षेत्रात येताना तिला आलेलय अनुभवांची मांडणी केली आहे. यामध्ये तिने ‘लहानपण देगा देवा’ या नाटकादरम्यानचे काही जुने फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री स्पृहा जोशीने हि पोस्ट तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. पहिली संधी आणि पहिल्या नाटकाचा हा अनुभव फोटोंद्वारे शेअर करताना तिने यात लिहिलं आहे कि, ‘अनुभवाने तुमची निवड बदलू शकते …. अभिनेत्री होणं हे माझं स्वप्न कधीही नव्हतं. अभिनयाकडे मी फक्त आवड, छंद म्हणून बघायचे. यात करिअर करण्याचा माझा कधीही विचार नव्हता. ‘अग्निहोत्र’ मालिकेत काम करत असताना मी दोनहून अधिक वर्ष यूपीएससी परिक्षेची तयारी करत होते. अभिनेत्री होण्यासाठीचे गुण माझ्यात नाहीत अशी भीती मला होती. त्यामुळे अभिनयाकडे करिअर म्हणून बघताना मी साशंक होते.’
पुढे, ‘पण नंतर मला सुनिल बर्वे यांच्या प्रोडक्शनचं मंगेश कदम दिग्दर्शित ‘लहानपण देगा देवा’ या नाटकात शरद पोंक्षे आणि अनेक दिग्गजांबरोबर करत करण्याची संधी मिळाली. हे माझं पहिलं व्यवसायिक नाटक होतं आणि तेव्हा मला जाणवलं की अभिनयातून मला जितका आनंद मिळतो तितका आनंद मला दुसरी कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही आणि मी अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला… तुमचं नशीब तुम्हाला योग्य स्थानी नेत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतं.’ स्पृहाची हि पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली असून अनेकांनी तिच्या विचारसारणीशी आपले विचार जुळत असल्याचे म्हटले आहे.
Discussion about this post