हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षी सर्वाधिक गाजलेलं प्रकरण म्हणजे मुंबई ड्रग्ज क्रूझ प्रकरण. ज्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा समावेश होता. आर्यन खान बरेच दिवस NCB च्या कस्टडीत राहिल्यानंतर कोर्टाने त्याला नियम आणि अटींसह जामीन मंजूर केला होता. यानंतर आज आर्यन हा अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असं वृत्त समोर आलं. यावर NCB च्या प्रमुखांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
https://www.instagram.com/p/Cal4PpeNpYT/?utm_source=ig_web_copy_link
NCB चे प्रमुख म्हणाले, कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानविरोधात पुरावे नसल्याचं ठरवणं हे घाईचं होईल. आर्यन हा अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असं वृत्त समोर आल्यामूळे NCB च्या अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना NCBच्या विशेष तपास पथकाचे प्रमुख संजय सिंह यांनी सांगितले कि, “आर्यनविरोधात पुरावे नसल्याचं म्हणणं खूप घाईचं होईल. आमचा तपास अद्याप सुरू आहे आणि याप्रकरणी आम्ही आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. पण आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत अजूनतरी पोहोचलेलो नाही.”
पुढे म्हणाले, गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी एनसीबीचे माजी विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांनी त्यांच्या टीमसोबत कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. या छाप्यात एनसीबीने क्रूझमधून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम मेफेड्रॉन, २१ ग्रॅम गांजा, MDMAच्या २२ गोळ्या आणि रोख १.३३ लाख रुपये जप्त केले होते. NCB’ने १४ जणांना रोखलं होतं आणि काही तासांच्या चौकशीनंतर ३ ऑक्टोबर रोजी दुपारी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धामेचा यांना अटक केली होती. “माध्यमांमध्ये जे वृत्त दाखवत आहेत त्यात काही तथ्य नाही. ते केवळ अंदाज आहेत. शिवाय अद्याप तपास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या टप्प्यावर काहीही सांगता येणार नाही. आर्यन खानकडे ड्रग्ज आढळलेच नव्हते, त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती, असे निष्कर्ष एसआयटीने काढल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र हे वृत्त संदीप सिंह यांनी फेटाळले आहेत.
Discussion about this post