हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तब्बल २ वर्षानंतर आता सिनेमा थिएटर विविध चित्रपटांच्या रिलीजमूळे तुडुंब भरल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणूनच आता लवकरच प्रेक्षकांना हसवायला आणि मनसोक्त जगविण्यासाठी अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत ‘युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन’ अंतर्गत आणि ‘रोलींगडाईस’ असोसिएशन सोबत निर्माते गोपाळ अग्रवाल निर्मित ‘झोलझाल’ हा २२ विनोद वीरांचा एकमेव हास्यकल्लोळ चित्रपट आज सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
झोलझाल चित्रपटात तब्बल २२ विनोदी कलाकार आहेत. या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, उदय टिकेकर, सयाजी शिंदे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, उदय नेने, अंकुर वाधवे, विश्वजित सोनी, श्याम मसलकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत.
याची कथा एका महालाभोवती फिरते आणि तो महल मिळवण्यासाठी कोण काय काय आणि कसे कसे झोलझाल करतय हे चित्रपट पाहिल्यावर समजेल. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरीही आधीपासूनच या चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. वैशाली सामंत, अवदूत गुप्ते, आदर्श शिंदे या गायकांनी सुरबद्ध केलेली गाणी तुफान गाजत आहेत.
‘युक्ती इंटरनॅशनल प्रोडक्शन’ अंर्तगत ‘झोलझाल’ रिलीज झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना अग्रवाल यांनी केली आहे आणि सहनिर्माते रश्मी अग्रवाल, विनय अग्रवाल आहेत. चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर सारिका गुप्ता आणि स्वप्निल गुप्ता आहेत. शिवाय चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता लिखित आहेत. चित्रपटाच संगीत प्रफुल-स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी केले आहे. तर अमेय खोपकर या चित्रपटाचे वितरक आहेत.
Discussion about this post