हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत आघाडीचे दिग्दर्शक केदार शिंदे हे आपल्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जातात. देशातील, राज्यातील कोणत्याही मुद्द्यावर आपले मत मांडताना केदार शिंदे कुणालाही जुमानत नाहीत. यात शनिवारी शिवसैनिकांकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. या प्रकारावरून मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया आपल्या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
वर्षानुवर्षे मांडीला मांडी लावून एकत्र बसलात. आता प्रत्येक गोष्टी मधे एकमेकांवर धावून जाताय? पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल. आम्ही फक्त युत्यासारख्या घटना पाहायच्या!! #लोकशाही
— Kedar Shinde 🇮🇳 (@mekedarshinde) February 5, 2022
केदार शिंदे यांनी अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून प्रतिक्रिया देताना म्हटले कि, “आता प्रत्येक गोष्टी मधे एकमेकांवर धावून जाताय? पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल. अश्या पद्धतीने केदार शिंदे यांनी टीका केली आहे. यात कुणाचेही नाव घेतले नसले तरीही रोख मात्र दोन वेगवेगळ्या पक्षांकडे होता हे कुणीही सांगेल. केदार शिंदे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यावरून निशाणा साधत हे ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले कि, “वर्षानुवर्षे मांडीला मांडी लावून एकत्र बसलात. आता प्रत्येक गोष्टी मधे एकमेकांवर धावून जाताय? पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल. आम्ही फक्त युत्यासारख्या घटना पाहायच्या!! लोकशाही,”असे शिंदे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “माझ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. हा हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसारच झाला आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष एकमेकांवर वार करताना अनेकदा दिसतात. तर अनेकदा मैत्रीपूर्ण भाव दर्शविताना दिसतात. त्यामुळे अनेकदा यांच्यातील वाद बाहेर येताच अनेक लोकांकडून टीका केल्या जातात.
Discussion about this post