हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशभर कोरोनाचा प्रार्दुभाव प्रचंड वाढला आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वेगाने वाढत आहे. ही सगळी परिस्थिती पाहाता अनेक राज्यात रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती असून लवकरच संपूर्ण लॉकडाऊन केला जाईल, असे म्हटले जात आहे. लॉकडाऊन करावा की नाही याबाबत सगळ्यांनी वेगवेगळी मतं ठोठावली आहेत. तसेच महेश कोठारेंनी देखील आपले मत व्यक्त केले. त्यांनी लॉक डाऊन हे उत्तर नाही म्हणत ट्विट केले. मात्र त्यांच्या या ट्विटमुळे बऱ्याच लोकांची मने दुखावली आहेत. प्रेक्षकांची नाराजी महेश कोठारे ज्या पद्धतीने ट्रॉल होत आहेत त्यावरून दिसून येत आहे.
But lock down is NOT THE ANSWER
— Mahesh Kothare (@maheshkothare) April 11, 2021
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे यांनी एक ट्वीट केले आहे. यामुळे त्यांना सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करीत अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. महेश कोठारे यांनी ट्वीट केले आहे की, लॉकडाऊन हे उत्तर नाहीये…. महेश कोठारे यांच्या या ट्वीटला सोशल मीडियावर अनेकांनी रिप्लाय केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, यांना कोरोना झाला तर सर्व सोयी सुविधा मिळणार म्हणून बोलायला सूचतयं. थाळी वाजवा तेवढच जमणार तुम्हाला.
यांना कोरोना झाला तर सर्व सोयी सुविधा मिळणार म्हणून बोलायला सूचतयं.
थाळी वाजवा तेवढचं जमणार तुम्हाला. pic.twitter.com/H3tiyMdPwY
— दादाराजे_9993 (@Omi9993) April 12, 2021
एका युझरने तर गेल्या लॉकडाऊनमध्ये हा प्रश्न का नाही विचारला असे म्हटले आहे. अजून एक सेलिब्रेटी भक्त सापडला मागच्या वर्षी झोपलेलात का आपण? त्या वेळी का नाही आठवले एवढे थोर विचार? लॉक डाऊन उत्तर नाही तर दुसरे उपाय काय आहे ते ही सांगाल का जनतेला? नुसते आग लावायची कामं आहेत ही. एवढी चांगली जागा बनवली मराठी प्रेक्षकांच्या मनात का अश्या पोस्टने ते खराब करू इच्छिता आपण… असे म्हणत सोशल मीडियावर प्रेक्षकांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे.
अजून एक celebrityभक्त सापडल मागच्या वर्षी झोपलेलात का आपण?त्या वेळी का नाही आठवले एवढे थोर विचार?Lockdown उत्तर नाही तर दुसरे उपाय काय आहे ते ही सांगाल का जनतेला?नुसते आग लावायचे काम आहेत ही.एवढ चांगली जागा बनवली मराठी प्रेक्षकांच्या मनात का अश्या पोस्ट ने ते खराब करू इच्छिता आपण
— Mastersagar (@Mastersagar8) April 12, 2021
एकाने तर तुमच्या घरात कोणी पॉझिटिव्ह निघाल्यास तुम्हाला खरी परिस्थिती कळेल असे म्हटले आहे. तसेच त्याचा स्वतःचा अनुभव देखील त्याने सांगितला आहे. या युझरने ट्वीट मध्ये म्हटले आहे की, तुमच्या घरात कोणी पॉझिटिव्ह आल तर कळेल, लॉक डाऊन पाहिजे की नाही… क्षमा असावी सर… माझी परिस्थिती पण हलाखीची आहे, रिक्षा आहे, कुठून हफ्ते फेडायचे, इलेक्ट्रॉनिक दुकान आहे, भाडे कसे द्यायचे, कूलर, पंखे याच दोन महिन्यात विकले जातात, पण वडील पॉझिटिव्ह निघून खूप काही त्रास झाला… कोरोनाची एवढी झपाट्याने वाढ…. जीव वाचवणे हीच सध्या कमाई…
https://twitter.com/AZAHARSHAIKH80/status/1381550547606536192?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1381550547606536192%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmarathi-cinema%2Fmahesh-kothare-got-trolled-social-media-due-his-tweet-lockdown-a588
Discussion about this post