हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला आज जगभरात जे काही स्थान आहे त्यासाठी अनेक जिद्दीचे हरहुन्नरी कलाकार झटले आहेत. दिवसरात्र आपापल्या क्षेत्रात अव्वल कार्य करीत त्यांनी सिने सृष्टीला एक वेगळा दर्जा मिळवून दिला. यामध्ये तंत्रज्ञ, दिग्दर्शक, निर्माता, कलाकार असा प्रत्येकजण सामील आहे. अगदी मेकअप आर्टिस्टपासून ते स्पॉट दादा पर्यंत प्रत्येकाने घेतलेल्या मेहनतीचे यश आज साता समुद्रापार गेलेली मराठी सिनेसृष्टी अभिमानाने मिरवतेय. यामागे कित्येक कलाकार आपला घाम गाळत होते आणि त्यापैकी एक म्हणजे सर्वांचे लाडके अशोक सराफ.
अतिशय चपखलपणे विनोदी भूमिका साकारणारे अशोक मामा लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचे लाडके आहेत. लाजवाब टायमिंगने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे. आज त्यांचा ७५ वा वाढदिवस आहे. म्हणजेच आजचा दिवस खास आहे. चला तर जाणून घेऊया मामांविषयी काही खास गोष्टी..
मित्रांनो अशोक सराफ यांचे खरे नाव अशोककुमार सराफ असे होते. पण मग अशोक सराफ आता नावात कुमार का लावत नाहीत..? याचे उत्तर निवेदिता सराफ म्हणजेच अशोक मामांच्या पत्नीने दिले आहे.
निवेदिता यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून अशोक कुमार यांच्यासोबत अशोक सराफ यांचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘गुरू-शिष्य…, मोठी बहीण विजया, अशोक कुमारांची खूप मोठी चाहती.. त्यांच्या अभिनयानं ती खूप भारावून गेली होती. धाकट्या भावाचा जन्म झाला तेव्हा तिने हट्टानं त्याचं नाव अशोककुमार ठेवायला आईला भाग पाडलं. ईश्वरानेही तथास्तु म्हटलं.
अशोककुमार सराफचाच पुढे झाला अशोक सराफ, असे निवेदिता यांनी या फोटोला कॅप्शन दिले होते. शिवाय अशोक मामा अशोक कुमार यांना गुरूस्थानी मानतात हे देखील सांगितले.
दिनांक ४ जून १९४७ रोजी मामांचा जन्म बेळगाव येथे झाला. हे साल स्वातंत्र्य घेऊन येणारे ठरले आणि याच वर्षात सिने सृष्टीसाठी एक हिरा जन्माला आला. मुंबईच्या गिरगावात शाळा आणि पुढे चौपाटीच्या विलसनमध्ये कॉलेज पूर्ण करून मामांची अभिनयाचे धडे गिरवले.
गोपीनाथ सावकार यांचं मार्गदर्शन घेत मामांनी कला क्षेत्रात पदार्पण केलं आणि सिने सृष्टी गाजवली. एकेकाळी फक्त ६ वर्षाचे असताना त्यांनी एकांकिका स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते आणि त्यानंतर आज अनेक नामांकित पुरस्कारांवर त्यांनी नाव कोरले आहे.
‘डार्लिंग डार्लिंग’ नाटकापासून सुरु झालेला प्रवास त्यांना ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटातील भूमिकेपर्यंत घेऊन आला. पण खरं नावलौकिक मिळालं ते दादा कोंडकेंच्या पांडू हवालदार चित्रपटातील सखाराम हवालदार या पात्रामुळे.
https://www.instagram.com/p/Bk_UtOogRnK/?utm_source=ig_web_copy_link
यानंतर रजत रक्षित यांच्या ‘दामाद’ सिनेमातून पहिल्यांदा हिंदी सिनेसृष्टीत मामांनी पाऊल टाकलं आणि हिंदू सिनेसृष्टीतही आपली जागा निश्चित केली. मामांच्या कारकिर्दीतील सगळ्यात हटके केमिस्ट्री होती ती लक्ष्यासोबत.
https://www.instagram.com/p/CeWEmXiO7vh/?utm_source=ig_web_copy_link
अर्थात दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे. हि दोस्ती काही औरच होती. जीवाला जीव देणारे हे मित्र नियतीने दुरावले पण आजही मामांच्या मनात लक्ष्या जिवंत आहे. शिवाय महेश कोठारे, सचिन पिळगांवकर यांचीही भारीच गट्टी होती.
https://www.instagram.com/p/Cdu6iWnPWzu/?utm_source=ig_web_copy_link
मामांचा लक्षात राहणार आणि एव्हरग्रीन चित्रपट ठरला तो म्हणजे ‘अशी हि बनवा बनवी’. आजही या चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग कायम आहे. चित्रपटाची लोकप्रियता , गाण्यांना मिळालेली पसंती एक इतिहास ठरला आहे.
https://www.instagram.com/p/CdyEUaZPqAT/?utm_source=ig_web_copy_link
आज वयाची पंच्याहत्तरी आली तरीही मामा एकदम यंग आहेत. शरीराने थोडे थकलेले असले तरीही दिल अभि जवान है। शिवाय एक हाडाचे कलाकार म्हणून ते नेहमीच फिल्डवर काम करताना दिसतात.
आजही मामा एक उत्तम कलाकृती सादर करीत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यात व्यस्त आहेत. मामांनी चित्रपटांसोबतचं अनेक नाटकांमध्येसुद्धा काम केल आहे आणि काही वर्षांपूर्वी ‘व्हॅक्यूम क्लीनर’ हे नाटक मामांच्या पदरी आलं. या नाटकाचं तालीम सुरु असतानाच एक किस्सा अभिनेता, लेखक आणि नाटकाचा दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर याने सांगितले आहे.
‘व्हॅक्यूम क्लीनर’ची तालीम शेवटच्या टप्प्यावर असताना मामांच्या उत्साहात अचानक खंड पडतोय असे जाणवू लागले. मी अनेकवेळा विचारणा करूनसुद्धा त्यांनी नेमकं कारण सांगितल नाही. मामा तसाच आपला सराव करत राहिले. पण मामांच्या ड्रायव्हरला जेव्हा विचारलं तेव्हा समजलं की, मामांच्या मानेपासून पाठीत एक मोठी कळ आली होती. त्यामुळे मामांची मान खूप दुखत होती. त्यांना प्रचंड वेदना होतं होत्या. तसे मामांना वरचेवर असे त्रास जाणवतात म्हणून ते आपल्यासोबत एक बाम ठेवतात. मात्र हा बाम असूनसुद्धा त्यांनी त्याचा वापर केला नव्हता.
याबद्दल मामांना एका मुलाखतीदरम्यान विचारलं असता त्यांनी अतिशय अवाक करणार असं कारण सांगितलं. ते म्हणाले, ‘माझ्याजवळ जो बाम आहे, त्याला खुपचं उग्र असा वास आहे आणि इथे तालीम करणाऱ्या सर्व कलाकारांना त्याचा वास सहन होणार नाही. त्यांना तो वास सहन करत आपलं काम करावं लागेल. त्यांना विनाकारण त्याचा त्रास होईल. म्हणून मी तो बाम लावायचं टाळलं’. हे ऐकून सगळेच थक्क झाले.
स्वतःला वेदना होत असतानादेखील ते इतरांचा विचार करत होते. अतिशय निस्वार्थी मामांचा हा स्वभाव त्यांच्या लाडके असण्याचं कारण आहे. ‘मी बहुरुपी’ पुस्तकात अशोक सराफ यांचा जीवनप्रवास वाचकांच्या भेटीला आला आहे. अशा कलाकाराची ओळख पुढल्या पिढ्यापिढ्यांना होण्याची गरज आहे.
अशा या हरहुन्नरी, बहुरूपी, हाडाच्या कलाकाराला आणि आपल्या सर्वांच्याच लाडक्या अशोक मामानं त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा!
Discussion about this post