हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल जग इतकं बदललं आहे कि नैतिकता आणि महत्त्वाकांक्षा या दोन्ही शब्दांचे पुरेसे अर्थ आणि वापर दोन्ही समाजबाह्य झाले आहेत. अशातच रुपेरी पडद्यावर एक वेगळे मनामनाला हात घालणारे कथानक घेऊन अक्षय कुमार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. कारण नैतिकता आणि महत्वाकांक्षा यामधून एकाची निवड करण्याच्या सातत्यपूर्ण संघर्षात जगणारा आणि परिस्थितीशी झगडणाऱ्या एका किशोरवयीन मुलाची ‘चुंबक’ हि कथा सोनी लिव्हवरील येत आहे. मुख्य म्हणजे पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपट ‘चुंबक’ हा काहीशी शिकवण देणारा चित्रपट आहे. आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येईल कारण प्रदर्शनासाठी आता बाळू आणि प्रसन्ना सज्ज आहे.
राष्ट्रीय पुरस्कार-विजेते दिग्दर्शक संदीप मोदी यांचे दिग्दर्शन आणि अक्षय कुमार प्रस्तुत चित्रपट ‘चुंबक’ या मराठमोळ्या चित्रपटामध्येमध्ये साहिल जाधव, स्वानंद किरकिरे आणि संगम देसाई हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट उद्या अर्थात १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सोनी लिव्ह या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ‘चुंबक’ चित्रपटाची कथा एका किशोरवयीन रेस्टॉरण्ट कामगार बाळू याची आधुनिक काळातील कथा आहे. जो स्वप्न पाहतो आणि साकार करण्यासाठी लोकांची फसवणूक करण्याचे ठरवतो. त्याचा एकमेव बळी ठरलेले प्रसन्ना (स्वानंद किरकिरे) यांच्याशी त्याचा सामना होतो.
यात प्रसन्ना हे बौद्धिकरित्या अक्षम असलेले वृद्ध आहेत. त्यानंतर बाळू नैतिकता आणि स्वप्न यांच्यामध्ये अडकतो. मग काय? बाळू आणि प्रसन्ना दोघेही एका प्रवासावर निघतात आणि हा प्रवास त्यांच्या जीवनाला कायमस्वरूपी कलाटणी देतो. या चित्रपटात बाळू महत्त्वाकांक्षा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी बौद्धिकरित्या अक्षम असणाऱ्या निरागस व्यक्तीची फसवणूक करेल का? की त्याचे मन बदलेल? असा एक प्रश्न तयार होतो. या प्रश्नाचे उत्तम हा चित्रपट पाहिल्यावरच मिळेल.
अभिनेता स्वानंद किरकिरे या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले कि, खरं सांगायचं तर अडचणी तशा आल्या नाहीत. मात्र, मला बराच मोठा आणि महत्त्वाचा रोल देऊ केला होता. प्रसन्ना ठोंबरे हे पात्र अत्यंत महत्त्वाचं असं पात्र आहे. त्याभोवती संपूर्ण कथानक फिरते. गतिमंद असलेल्या प्रसन्नाचे व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी मी आणि माझे दिग्दर्शक संदीप मोदी आम्ही अनेक लोकांना, डॉक्टर्सना भेटलो. त्यावर अभ्यास केला. पण, मजा आली एक वेगळी भूमिका करायला मिळाली.
Discussion about this post