हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। २०११ साली प्रदर्शित झालेला ताऱ्यांचे बेट या चित्रपटाला चक्क १० वर्षे पूर्ण झाली आहेत. नीरज पांडे आणि शीतल भाटिया यांच्या फ्रायडे फिल्मवर्क, अल्ट एंटरटेनमेंट आणि बालाजी मोशन पिक्चर्स यांनी या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. तर या चित्रपटाची सहनिर्मिती एकता कपूर, शोभा कपूर आणि नितीन चंद्रचूड यांनी केली होती. या चित्रपटातील मुख्य भूमिका अभिनेता सचिन खेडेकर यांनी साकारली होती. याबाबत व्यक्त होतानाचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.
@SachinSKhedekar shares a heartfelt note on the 10th anniversary of our Marathi Film, #TaryancheBait!@neerajpofficial @ShitalBhatiaFFW @ektarkapoor @balajimotionpic @BTL_Balaji @SachinSKhedekar @IshanTambe #AltEntertainment #NeerajPandey #ShitalBhatia #EktaKapoor #ShobhaKapoor pic.twitter.com/qvU4IjcMHR
— Friday Filmworks (@FFW_Official) April 14, 2021
या व्हिडिओत सचिन खेडेकर यांनी सांगितले की, “मला ‘ताऱ्यांचे बेट’चा भाग होण्याचे सौभाग्य मिळाले. हा एक अतिशय गोड चित्रपट आहे आणि मला यातील भूमिका साकारताना आनंद मिळाला. या विषयात ग्रामीण भागातील निरागसता आणि सकारात्मकता आहे आणि मला वाटते की आधीच्या तुलनेत या सगळ्याची आताच्या चित्रपटांमध्ये अधिक आवश्यकता आहे.”
Celebrating 10 Years of our first National Award winning Marathi film, #TaryancheBait!@neerajpofficial @ShitalBhatiaFFW @ektarkapoor @balajimotionpic @BTL_Balaji @SachinSKhedekar @IshanTambe #FridayFilmworks #Anniversary #AltEntertainment #NeerajPandey #ShitalBhatia #EktaKapoor pic.twitter.com/yTaixOBKeG
— Friday Filmworks (@FFW_Official) April 14, 2021
या चित्रपटाचे कथानक कोकणातील श्रीधर या सर्वसामान्य घरातील प्रमुख माणसाभोवती फिरते. श्रीधर एक साध्य क्लार्कची नोकरी करत असतो. तो आपल्या कुटुंबियांना मुंबईत फिरायला घेऊन येतो. शहराचा देखावा पाहून आश्चर्यचकित झालेला, त्याचा मुलगा पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्याचा आग्रह धरतो. असा आपल्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीचा श्रीधरचा कठीण प्रवास सुरू होतो. चित्रपटामध्ये दाखवलेल्या प्रसंग आणि भावनांबद्दल बोलताना खेडेकर म्हणतात, “पालक नेहमीच आपली नैतिक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या मुलांवर सोपवतात आणि त्यांना हे सर्व शिकवण्याचा प्रयत्न करतात हे आपण नेहमीच पाहिले आहे. परंतु मुले तुम्हाला अधिक शिकविण्यात नेहमीच यशस्वी ठरतात, हे कदाचित कोणाला समजले असेल.”
Have you watched our National award-winning Marathi film yet? Head out to @ZEE5India app to watch this gem, #TaryancheBait!@neerajpofficial @ShitalBhatiaFFW @ektarkapoor @balajimotionpic @BTL_Balaji @SachinSKhedekar @IshanTambe pic.twitter.com/88LIovG4Xr
— Friday Filmworks (@FFW_Official) April 14, 2021
सचिन खेडेकर यांनी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करणारे किरण यज्ञोपवीत यांचे आभार मानले आहेत. नीरज पांडे यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले की, क्रिएटिव्ह निर्माता नीरज पांडे यांनी मला खूप मदत केली. त्यांनी या कथेला पाठिंबा दिला आणि आम्ही हा चित्रपट तयार करू शकलो आणि त्यासाठी पुरस्कारही मिळाले. फ्रायडे फिल्मवर्क्सने, या सुंदर चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल आणि मला याचा भाग बनवल्याबद्दल आभार. “या चित्रपटात दिवंगत अभिनेते विनय आपटे, अश्विनी गिरी, अश्मिता जोगळेकर, किशोर कदम, शशांक शिंदे आणि ईशान तांबे यांच्याही प्रमुख अश्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
Discussion about this post