Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘वारी मुक्कामाला पोचली कि परतवारी करणं भागच असतं’; ‘संगीत देवबाभळी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 2, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Sangeet Devbabhali
0
SHARES
70
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भद्रकाली प्रोडक्शन निर्मित आणि प्राजक्त देशमुख लिखित, दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर जणू एक इतिहास रचला आहे. शाळा, कॉलेज, साहित्य अकादमी पर्यंत या नाटकाचे हात पोहोचले. मराठीच नव्हे तर बहुभाषिक नाट्य वेड्या रसिकांनीसुद्धा या नाटकावर भरभरू प्रेम केलं. व्यावसायिक रंगभूमीवर ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने आजवर ४४ पुरस्कार पटकावले आहेत. या नाटकाला ‘साहित्य अकादमी’ युवा पुरस्कारदेखील मिळाला आहे. विशेष आणि अभिमानाची बाब म्हणजे हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. यानंतर आता ‘संगीत देवबाभळी’ नाटकाचा हा विक्रमी प्रवास सांगतेकडे मार्गस्थ झाला आहे. उरलेल्या काहीच प्रयोगानंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर पाहता येणार नाही आणि या निमित्ताने निर्माते आणि लेखक यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhadrakali Productions (@teambhadrakali)

या नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी आणि लेखक प्राजक्त देशमुख यांनी हि पोस्ट शेअर केली आहे. यात लिहिलंय की, ‘संगीत ‘देवबाभळी’ शेवटचे काही प्रयोग…. २२ डिसेंबर २०१७ म्हणजे तब्बल ५ वर्षापुर्वी ‘संगीत देवबाभळी’ हा प्रवास तुमच्या साक्षीने सुरु केला. नवं संगीत नाटक? फक्त दोन मुली? एक नवीन दुसरी अनुभवी, नवा लेखक दिग्दर्शक? नवा संगीत दिग्दर्शक? नवा प्रकाशयोजनाकार? अशा अनेक प्रश्नांवर स्वार होऊन ‘भद्रकाली’ च्या ह्या नाटकाने ५ वर्षात महाराष्ट्र शासन, झी नाट्य गौरव, म. टा. सन्मान असे आणि याशिवाय अनेक मानाचे पुरस्कार पटकावले. ह्यावर कळस होता तो ‘संगीत देवबाभळी’ नाटकाच्या संहितेला मिळालेला युवा साहित्य अकादमी पुरस्कार. सगळा स्वप्नवत प्रवास.’

View this post on Instagram

A post shared by Bhadrakali Productions (@teambhadrakali)

‘एकूण मिळालेल्या सर्वाधिक ४४ पुरस्कारांपेक्षाही सगळ्यात मोठा पुरस्कार होता तो…रसिक मायबापहो तुमचं प्रेम. कुणी भरभरून लिहायचं, कुणी मिठ्या मारायचं, कुणी पाया पडायचं, कुणी २२-२२ वेळा नाटक पहायचं ! हे सगळं किती अविश्वसनीय आहे ! ‘भद्रकाली’ने नेहमीच नवता आणि मनोरंजनाचा ध्यास घेतला. स्व. मच्छिंद्र कांबळी ह्यांचा वारसा पुढे नेताना त्याला आणखी वैभवशाली करण्याकडेच आमचा कल होता, आहे आणि अर्थात पुढे राहिल. पण थांबायचं ठिकाण माहित नसतांना सुरु असलेल्या प्रवासाला ‘भटकणं’ म्हणतात. आणि वारी एकदा मुक्कामाला पोचली की परतवारी करणं भागच असतं. तर रसिक मायबापहो, परतवारी सुरु होतेय. येत्या काही दिवसात आम्ही पुन्हा त्याच तन्मयतेने तुमच्या पुढं येतोय. पण आता हे निरोपाचे प्रयोग असतील. भेटूया तुमच्या जवळच्या नाट्यगृहात. बरं नाट्यगृह जवळ नसलं तरी आता मात्र भेटायचं चुकवू नका कारण…. संगीत देवबाभळी…. निरोपाचे काही प्रयोग.” असे या पोस्ट मध्ये म्हंटले आहे. तेव्हा हे नाटक प्रत्येकाने आवर्जून पाहाच..’

View this post on Instagram

A post shared by Bhadrakali Productions (@teambhadrakali)

‘भंडाऱ्याच्या डोंगरावर संत तुकोबांसाठी भाकरी घेऊन गेलेली आवली काटा रूतून बेशुद्ध होते. तिला सावरायला लखुबाई बनून साक्षात रखुमाई तिच्या मदतीला धावते. यावेळी त्यांच्यात घडलेला संवाद आणि त्यांच्यातील भावनांचे बंध प्राजक्त देशमुख यांनी नाटकात उत्तम रेखाटली आहे. रखुमाईला आवलीच्या बोलण्यातून कळलेलं तीच मन, लौकिक भान आणि साध्या सांसारिक प्रश्नांची उकल या नाटकाचा जीव आहे. या नाटकात अभिनेत्री मानसी जोशी हिने रखुमाई तर अभिनेत्री शुभांगी सदावर्तेने आवलीची भूमिका साकारली आहे. प्रसाद कांबळी यांच्या ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ने हे नाटक रंगभूमीवर आणले आणि या नाटकाने प्रेक्षकांना आपलेसे करून घेतले. या नाटकाला निरोप देताना साहजिकच रंगभूमीदेखील भावनिक होत असेल.

Tags: Instagram PostMarathi PlaySangeet Devbabhaliviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group