Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘..नाहीतर मी उठून जातो’; भाजपच्या दीपोत्सवात बॉलिवूड कलाकाराच्या सन्मानासाठी मराठी गायकाचा अपमान

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 21, 2022
in Hot News, Trending, बातम्या, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
146
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईतील मोक्याचं ठिकाण मानल्या जाणाऱ्या वरळीच्या जांबोरी मैदानात भाजप पक्षाद्वारे दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अनेक कलाकार आपली हजेरी लावणार असून चाहत्यांची भेट घेताना दिसणार आहेत. त्यामुळे या दीपोत्सवाकडे नागरिक आकर्षित होत आहेत. दरम्यान मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव या कार्यक्रमात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा बॉलिवूड कलाकाराच्या सन्मानासाठी अपमान करण्यात आल्याचे समोर आले आहे. जे अत्यंत खेदजनक आहे.

हाच का मराठी कलाकारांचा सन्मान….!!!!

भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे
मराठी कलाकारांची चेष्टा……..@abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @JaiMaharashtraN @zee24taasnews @ANI @ShivsenaComms pic.twitter.com/f7HxpcFbUV

— Sachin Ahir (@AhirsachinAhir) October 20, 2022

राहुल देशपांडे यांना मुद्दाम अपमानित केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी केला आहे. याबाबतचा तास एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडिया ट्विटर हॅण्डलवर ट्विट केला आहे. भाजपच्या या कार्यक्रमात राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय आणि कर्णमधुर गायन सुरू होते. यावेळी मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा हे बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याला थेट मंचावर घेऊन आले. यावेळी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक पुष्कर श्रोत्री याने ‘आता आपण एक ५ मिनिटांचा ब्रेक घेऊयात’, अशी घोषणा केली. ज्यामुळे राहील देशपांडे नाराज झाले.

एका शास्त्रीय गायकाला मध्येच गायनापासून थांबविणे हे फारच लज्जास्पद आहे. राहुलजी देशपांडे हे टायगर श्रॉफ पेक्षा खूप मोठे आहेत. त्यांच्या कलेची आणि टायगर ची तुलना कधीही होऊ शकत नाही. अशावेळी हे भाजपवले त्याचा सत्कार करण्यासाठी गाणं थांबवितात हे योग्य नाही.

— जयेश – jayesh (@Jayesh_dt) October 20, 2022

आपली नाराजी व्यक्त करत राहुल देशपांडे यांनी पुष्करला जवळ बोलावून ‘एक मिनिटांचा ब्रेक घेतला, तरी मी नंतर गाणार नाही, माझं गाणं होईपर्यंत मला ब्रेक नकोय’, असे स्पष्ट सांगितले. हा आवाज माईकवर ऐकू येत होता. आमदार मिहीर कोटेचा यांना हा सर्व प्रकार लक्षात येताच त्यांनी आपल्या एका सहकाऱ्याला पुष्कर आणि राहुल यांच्याशी संवाद साधण्यास पाठवले.

मराठमोळी दिवाळी ???

— संजय (@1sanjaychavan) October 20, 2022

यावेळी राहुल यांनी अतिशय ठाम भूमिका घेत म्हटले कि, ‘त्यांना म्हणा २० मिनिटे थांबा, २० मिनिटात मी गाणे संपवतो आणि मग काय करायचं ते करा. मला हे असं चालणार नाही, नाहीतर मी उठून जातो.’ इतकं होऊनही टायगरचा दणक्यात सत्कार करण्यात आला. अखेर ‘मी उठू का?’ हा प्रश्न विचारत असल्याचा राहुल देशपांडे यांचा आवाज ऐकू आला. यावर सचिन अहिर यांनी भाजपवर कठोर टीका करीत म्हटलं आहे कि, ‘हाच का मराठी माणसांचा सन्मान’

Tags: BJPDiwali 2022Marathi SingerRahul Deshpandetiger shroffTwitter TrendingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group