हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘पुष्पा- द राईज’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिस म्हणू नका, सोशल मीडिया म्हणू नका सगळीकडे हाच चित्रपट चर्चेत आहे. काही केल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ची क्रेझ काही कमी होईना. याशिवाय ‘पुष्पा’च्या गाण्याची जादू तर कहर झाली आहे. ज्याच्या त्याच्या तोंडात श्रीवल्ली, ये मेरा अड्डा, सामी हीच गाणी आहेत. यातील ‘श्रीवल्ली’ हे गाणं तर चांगलंच ट्रेंडमध्ये राहिलं आहे. गाण्याचे बोल आणि अल्लू अर्जुनच्या डान्स स्टेप्स. बस्स. कमाल.. बहार.. तर मग अशा ट्रेंडिंग गाण्याच मराठी व्हर्जन येणार नाही असे कसे होईल. अलीकडेच पुणेकर वाहतूक पोलीस आतिश खराडे यांनी ‘श्रीवल्ली’ गाण्याचा मराठी अंदाज सादर केला आहे जो तुफान व्हायरल होतोय.
अगदी काही महिन्यांपूर्वीच ट्रॅफिक हवालदार आतिश खराडे यांनी ‘मनिके मागे हिथे’ या गाण्याच्या मराठी व्हर्जन गायले होते. ते गाणे चांगलेच चर्चेत राहिले होते. यानंतर आता त्यांनी ‘श्रीवल्ली’ गाणे गायले आहे. AK Police नावाच्या यूटय़ूब चॅनेलवर त्यांनी हे गाणे शेअर केले आहे. खराडे यांनी हे गाणं नुसतं गायलं नाही बरं का, तर त्याचा व्हिडीओही केला आहे. या व्हिडिओला आणि गाण्याला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. गेल्या ११ जानेवारी २०२२ रोजी त्यांनी हे गाणे यूटय़ूब चॅनेलला शेअर केले होते. यासाठी त्यांना हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.
या गाण्याबाबत बोलताना ट्रॅफिक हवालदार आतिश खराडे यांनी सांगितले कि, हे गाणं मी स्वतः लिहून गायले आहे. कोणत्याही स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग केलेले नसून मोबाईलमध्ये केले आहे. तर आतिश खराडे वाहतूक पोलीस विभागातील नोकरी सांभाळून आपली गाण्याची आवड नेहमीच जोपासताना दिसत असतात. खरंतर गाण्याची त्यांना शाळेपासूनच आवड होती. पण एकंदरच परिस्थितीमुळे त्यांना गायन क्षेत्राकडे वळता आले नाही. पापी पेट का सवाल है भाई मग काय? पोटापाण्यासाठी नोकरी गरजेची होती. पण आवड कशी सोडणार? म्हणूनच आता ते नोकरी सांभाळून आपली गाण्याची आवड जोपासताना दिसत आहेत.
Discussion about this post