हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या घरात काही दोस्त होतात तर काही दुश्मन. काही लोक बाहेरचं घरात आणतात तर काही लोक घरातलं बाहेर टिकवतात. अशीच एक यारी न झालेली दुष्मनी प्रियांका चहर चौधरी आणि निम्रीत अहलुवालिया यांच्यात पहायला मिळते आहे. बिग बॉस १६ च्या घरात आल्यापासून या दोघी एकमेकींशी नुसत्या भांडत आहेत. कधी या कारणावरून, कधी त्या कारणावरून. कारण काहीही असलं तरीही दोघींना आपण बरोबर आहोत हे सिद्ध करायचं असत. यावेळी तर हद्दच झाली. दोघीही खाण्यावरून भांडताना दिसल्या. हे पाहून प्रेक्षक भडकले आहेत.
कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर काही प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. त्यानुसार, प्रियांका आणि निम्रीत चक्क भाजी खाण्यावरून भांडताना दिसल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो कि, प्रियंका स्वतःला आणि अंकितला भाजी कमी मिळण्यावरून टीनासोबत बोलताना दिसते आहे. यावेळी तिथेच आसपास निम्रीत देखील आहे. प्रियांका बोलते कि, मी सगळ्यांची ताटं पाहिली. सगळ्यांनी आपल्याला हवी तेव्हढी भाजी घेतली आहे. मी आताशी दोन पीस घेऊन चालली आहे. द्यायचं असेल तर सगळ्यांना नीट द्या नाहीतर देऊ नका.’ असंही ती म्हणते.
यावर निम्रीत मी एव्हढीच भाजी घेतलेली, मी एव्हढीच चपाती घेतलेली. प्रत्येक वेळी बोलायची काय गरज. हि बाई एकदम खालच्या दर्जाला जाते आणि असं बरंच काही बोलते. निम्रतने प्रियंकाला शिवीगाळही केली. प्रियंकाला मारण्याबाबत बोलताना निम्रतने शालीनला शिवीगाळ केली. निम्रत रागात म्हणाली, ‘मी त्याला मारून टाकेन…’. ज्यावरून दोघींमध्ये चांगलीच जुंपते. यावेळी दोघींनाही गप्प रहा सांगण्यासाठी बाकीचे सदस्य कष्ट घेत असतात पण त्या काही गप्प बसत नाहीत. हा प्रकार पाहून नेटकरी असं म्हणत आहेत कि, या दोघी मुद्दाम एकमेकींच्या कळी काढत असतात. शिवाय हे लोक खेळायला नाही फक्त खायला आले आहेत. एकीकडे शालीन चिकन मागतो. साजिद चपाती आणि आता या दोघी भाजी.
Discussion about this post