हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनमध्ये चॅलेंजर्स काय आले घराचा कायापालटचं झाला. संथ गतीने चालणारा मनाला येईल तसा वाहत चाललेला बिग बॉसचा खेळ आता लाईनवर आलाय. या घरात आतापर्यंत आपण राडे पाहिले, मारामाऱ्या पाहिल्या, बाचाबाची, शिवीगाळ असे सगळे किस्से पाहिले. अशातच घरात चॅलेंजर्स म्हणून राखी सावंत, मीरा जगन्नाथ, विशाल निकम आणि आरोह वेलणकरने एंट्री घेतली. यातील मीरा आणि विशाल केवळ एका आठवड्याचे पाहुणे म्हणून सहभागी झाले होते ज्यांचा प्रवास काल संपला. पण राखी आणि आरोह मात्र घरात टिकून राहिले आहेत. आज या दोघांमध्ये नॉमिनेशन टास्कदरम्यान बेक्कार भांडण होताना दिसणार आहे.
घरामध्ये होणाऱ्या टास्क दरम्यान भांडण फारच साधी गोष्ट आहे. पण आता घरात ड्रामा क्विन राखी सावंत आणि आरोह वेलणकर हेदेखील स्पर्धक म्हणून खेळात आहेत. यातच एका टास्कदरम्यान यांमध्ये जोरदार भांडण झालं आहे. जे पाहून सगळेच थक्क झाले. बिग बॉसने घरातील सदस्यांना शाई फेक हे नॉमिनेशन कार्य दिले आहे. ज्यामध्ये दोन सदस्य एकमेकांच्या चुका सांगताना दिसणार आहेत. तर आरोह राखीबदल तक्रार सांगताना बोलतो, ‘राखी सारखी कुरघोडी करते. गळ्यात लिंबू मिरची बांधते आणि सारखी चर्चेत राहण्यासाठी काही ना काही करत असते’. यावर राखी बोलते, ‘मी तुझ्यासारखं झोपा तर नाही काढत.’ यावर आरोह बोलतो, ‘तुझ्या बापाचं काय जातंय’.
आरोहने आपल्या बापाचं नाव काढताच राखीची सटकते आणि ती जोराजोरात रागवून त्याला बोलते, ‘बापावर जाऊ नको’. यावर पुन्हा आरोह म्हणतो.. का.. मी तर जाणार.’ यामुळे राखी आणखीच चिडते आणि थेट आरोहवर धावून जाते. राखीला भडकलेली पाहून घरातील इतर सदस्य तिला अडवण्याचा प्रयत्न करतात. आता या भांडणाचा परिणाम नेमका काय असेल..? हे तर आजच्या भागात दिसेल. पण सोशल मीडियावर हा प्रोमो व्हायरल होत आहे आणि प्रेक्षक आरोहने वापरलेल्या वाक्यासाठी नाराजी व्यक्त करत आहेत.
Discussion about this post