हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजच युग हे सोशल मीडियाचं युग आहे. त्यामुळे चित्रपट, वेब सिरीज, मालिका यांशिवाय रिल्स हा नवा फॉरमॅट जोरात ट्रेंड करतोय. यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसुद्धा सेलिब्रिटी झाले आहेत. तरुणांना या इन्फ्लुएन्सरच्या कंटेन्टने एव्हढं वेड लावलंय कि मार्केट जाम झालंय भाऊ.. एकंदरच काय तर इन्फ्लुएन्सरचा जमाना है बॉस. हजारो फॉलोवर्स असणारे हे इन्फ्लुएन्सर आता सेलिब्रिटी झाले असले तरीही यांचं आयुष्य मात्र सर्व सामान्यच आहे. त्यांनीही स्ट्रगल केलंय. असाच आपल्या स्ट्रगलविषयी बोलताना नीलने आपले अनुभव आणि परिस्थिती चाहत्यांसह शेअर केली आहे.
इन्फ्लुएन्सर्सच्या गर्दीत आपले वेगळेपण जपणारे आणि सिद्ध करणारे दोन इन्फ्लुएन्सर्स म्हणजे नील आणि करण. नुकतीच त्यांनी प्लॅनेट मराठी ओटीटीवरील ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी नीलने प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर होण्याआधीचे एक मोठे सत्य उघड केले. एकेकाळी त्याच्याकडे चहा पिण्याइतके पैसेही नव्हते पण आता मात्र तो त्याच्या कॉन्टेन्टने पेटीमध्ये पैसे उचलतो असे तो म्हणाला. त्याचा इथंवरचा हा प्रवास त्याने यावेळी आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे.
इतकंच काय तर भन्नाट किस्से, खूप गंमती जमती आणि ढिनच्यॅक गप्पांनी हा एपिसोड रंगला आहे. यावेळी नीलने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत काम केल्याचा एक भन्नाट अनुभवही शेअर केला आहे. आता तो किस्सा नक्की काय आहे..? हे तुम्हाला हा एपिसोड पाहिल्यावरच कळेल. नील सोबत करण सोनावणेही या शोमध्ये सहभागी झाला होता आणि त्यानेही काही अनुभव तसेच किस्से शेअर केले आहेत.
करणने त्याच्या महाविद्यालयीन जीवनातील कॉपी करतानाचा किस्सा आणि जेवणाचा किस्सा यावेळी आवर्जून सांगितला. ‘पटलं तर घ्या विथ जयंती’चा हा एपिसोड आज ३ मार्च रोजी, शुक्रवारी प्लॅनेट मराठी ओटीटीवर रिलीज झाला आहे. त्यामुळे तुम्ही हा एपिसोड पाहू शकता.
Discussion about this post