हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट अभिनेत्री मेघा घाडगे तिच्या सोशल मीडियावरील विविध पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनमध्ये मेघा घाडगेचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळाला. प्रेक्षकांनी तिचा हा अंदाज पसंत देखील केला. या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर मात्र मेघा चांगलीच चर्चेत राहिली. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना अनेकदा ती विविध पोस्ट शेअर करते. ज्यामुळे काही लोक तिला विविध कारणावरून ट्रोल करतात. असंच ट्रोलिंग तिच्या कपड्यांवरून झाल्याने मात्र मेघाने संताप व्यक्त केला आहे. तिने पोस्ट शेअर करत ‘जगा आणि जगू द्या’ म्हणत ट्रोलर्सला त्यांची जागा दाखवली आहे.
हि पोस्ट शेअर करताना मेघा घाडगेने लिहिलंय कि, ‘मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणते आणि कसे कपडे घालायचे याचा सर्वस्वी अधिकार आणि सामाजिक भान मला आहे आणि बहुतेक हे सर्वांनांच असत. नाही का ?? जिथे बोलायला आणि comment करायला हवी तिथे मात्र तोंड आणि बुद्धी जाणूनं बुजून बंद ठेवता तेव्हा तुमचे संस्कार पाणी त्यायला जातात. मी माझी रंगमंचावरील जबादारी कोणतही राजकारण न करता चोख पार पाडते . तिथे मला बंधन आहेत . पण माझ्या खाजगी आयुष्यात डोकवायला आणि बोलायला कोणालाही मी अधिकार दिलेले नाहीत . तर कृपया जगा आणि जगुद्यात’.
मेघा घाडगेने हि पोस्ट बुधवारी शेअर केली होती. मात्र तिने मांडलेला विषय आणि ट्रोलर्सला दिलेली कानपिळी चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. मेघाने या पोस्टमध्ये तिचे काही फोटो आणि व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. यातील एक फोटो हा कार्यक्रमापूर्वीचा आहे आणि दुसरा फोटो हा लावणीच्या कार्यक्रमातील आहे. तसेच यातील व्हिडीओत मेघा एका पुरस्कार सोहळ्यात असल्याचे दिसत आहे. मेघाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून ट्रोलर्ससाठी एक सणसणीत उत्तर आहे म्हणायला हरकत नाही.
Discussion about this post