हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेता पृथ्वीक प्रतापने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना वेड लावलं आहे. हास्याचा स्फोट करत प्रेक्षकांच्या मनात घुसून पोटात गुदगुदल्या करणाऱ्या जत्रेकऱ्यांमध्ये पृथ्वीकचा समावेश आहे. पृथ्विक सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्यामुळे त्याचे फॉलोवर्सही प्रचंड आहेत. पण नुकतीच त्याने एक अतिशय धक्कादायक बाब समोर आणली आहे. जातीवरून होणार द्वेष आणि राग याबाबत बोलताना त्याने जातीवरून कमी लेखणाऱ्यांना सुनावले आहेत.
अभिनेता पृथ्विक प्रतापने आपल्या नावापुढे आडनाव का लावत नाही.. याचा खुलासा करताना एका मुलाखतीत म्हटले कि, ‘मला आजवर पाच मुलींनी जातीमुळे नाकारलं आहे. जेव्हा आपण कुलकर्णी, शिंदे, पाटील अशी आडनावं सांगतो तेव्हा त्यावरून लगेचच आपल्याला जज केलं जातं की तुम्ही कोणत्या जातीचे आहात. मी लहानपणापासून हे पाहिलं आहे. माझ्या जवळचे अनेक मित्र यातून गेले आहेत. पण हा त्रास मला सहन होत नाही. आडनाव पाहून एका विशिष्ट चौकटीत तुम्हाला अडकवलं जातं. मला माझ्या जातीबद्दल कमीपणा वाटतो असं मुळीच नाही. प्रत्येकाला आपल्या जातीचा आदर असतोच. पण आडनाव काढून टाकलं तर तुम्ही त्या व्यक्तीला माणूस म्हणून ट्रीट करता. आपल्याला फक्त नावावरूनच का ओळखले जाऊ नये. आडनाव सांगितलं की लगेचच तुम्ही त्याची जात शोधायला लागता’.
पुढे म्हणाला, ‘माझे पाच ब्रेकअप तर याच कारणामुळे झालेले आहेत. तिघी जणींनी तर मला जातीवरून रिजेक्ट केलं. तर चौथी जी माझी गर्लफ्रेंड होती. तिचे आईबाबा आजही माझ्याशी तेवढ्याच आपुलकीने बोलतात, मला त्यांच्या घरी बोलावतात, खाऊ घालतात. सगळं काही छान होतं पण नंतर तिने माझ्या कामावर, माझ्या पगारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. नकार द्यायचा म्हणून ती वेगवेगळी कारणं शोधत होती. पण मग शेवटी तिने आपली जात एक नाही म्हणून नकार दिला. खरं तर अगोदर याच कारणामुळे मला तिघींनी नकार दिला होता. हिने केवळ डायरेक्ट नकार न देता गोष्ट फिरवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक जातीला त्याचा सन्मान मिळायला हवा, त्यावरून त्याचं अस्तित्व ठरवण्याचा कुणालाही अधिकार नाही. मी ‘कांबळे’ नसतो ‘कुलकर्णी’ असतो तरीही मी माझं आडनाव लावलं नसतं. प्रत्येक माणसाला फक्त त्याच्या नावावरून माणूस म्हणून ओळखलं जावं एवढीच माझी इच्छा आहे’.
Discussion about this post