हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रकाश झोतात आलेला प्रसाद खांडेकर एक उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि अवली अभिनेता म्हणूननेहमीच चर्चेत असतो. हास्यजत्रेतील अनेक विनोदी स्किट्समध्ये प्रसादने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना लोटपोट हसवले आहे. त्यामुळे प्रसादच चाहता वर्ग दिवसागणिक वाढू लागला आहे. अशातच प्रसाद खांडेकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी कि, त्याला ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते नाट्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
याविषयी सांगताना अभिनेता प्रसाद खांडेकरने लिहिलंय कि, ‘…आजच्या ह्या रंगभूमी दिनी एक आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर करायची आहे ती म्हणजे नुकताच मला ‘विग्नहर्ता प्रतिष्ठान’ तर्फे “नाट्यगौरव” पुरस्कार मला जाहीर झाला. ….आणि अजून एक सुखावणारी गोष्ट ही की हा पुरस्कार माझ्यासोबत माझा भाऊ सुशील इनामदार ह्याला सुद्धा जाहीर झाला … विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या सगळ्या मान्यवरांचे खुप खुप खुप आभार. आणि माझ्या नाटकावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मायबाप रसिकांना अभिवादन. रंगभूमी चिरायू होवो’.
अभिनेता प्रसाद खांडेकरने शेअर केलेली हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रसादाचे चाहते, सहकलाकार या पोस्टवर त्याचे कौतुक करत आहेत. शिवाय त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. प्रसाद खांडेकर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात नेहमीच विविध पात्रे साकारताना दिसतो. यातील त्याचे अवली लवली कोहली हे पात्र प्रचंड लोकप्रिय आहे. इतकेच नव्हे तर या पात्राने घेतलेला टोन आणि बोलण्याची पद्धत यावरून एक गाणं देखील तयार करण्यात आलं आहे. जे सोशल मीडियावर सध्या रिल्समध्ये व्हायरल होताना दिसत आहे.
Discussion about this post