हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ‘ती येणार… ती येणार…’ अशी चर्चा रंगली होती. आता हि ती म्हणजे कोण..? तर फुलराणी… पण हि फुलराणी कोण आहे..? याबाबत किंचितही खबर कुणाच्या कानाला लागली नाही. वर्षभर सुबोध भावेने फुलराणी’बाबतची उत्सुकता ताणून धरली होती. ती येणार.. म्हणून नुसता आनंदी आनंद निर्माण झाला होता आणि अखेर ती आलीच. ‘फुलराणी’ कोण यावरून आता पडदा उघड झाला आहे आणि हि फुलराणी आपल्या ओळखीची आहे बरं का..? हास्यजत्रेतली प्रियदर्शनी इंदलकर तुम्हाला ठाऊक असेलच ना!! आता तिला प्रियदर्शनी म्हणायचं नाही.. तर ‘फुलराणी’ म्हणायचं.
नुकतीच ‘फुलराणी’ची झलक सोशल मीडियावर पहायला मिळाली आणि भल्याभल्यांच्या दांड्या गुल्ल झाल्या. आतापर्यंत हि फुलराणी कोण असेल..? यावर तुफान चर्चा रंगली होती. वारंवार फुलराणीला विषय चघळला जायचा आणि जो तो आपापल्या आवडत्या अभिनेत्रींचे नाव दामटवायचा. कुणी प्रिया बापट म्हटलं तर कुणी केतकी माटेगांवकर, इतकंच काय तर कुणी सायली संजीव आणि अगदी हृता दुर्गुळेचंसुद्धा नाव घेतलं. पण यानंतर आता अखेर फुलराणी कोण..? या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे आणि हि दुसरी तिसरी कुणी नसून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आहे.
यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २२ मार्च २०२३ रोजी सर्वत्र चित्रपट गृहात हि ‘फुलराणी’ आपल्या भेटीसाठी येणार आहे. पण त्यापूर्वी १३ फेब्रुवारी २०२३ रोजी ती कोण आहे याचा उलघडा करण्यात आल्याने सोशल मीडियाही दणाणला आहे. प्रियदर्शनीचा हा हटके अंदाज सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला असून तिच्या अदाकारीला नेटकऱ्यांनी विशेष पसंती दिली आहे. या टीझरमध्ये तिच्या तोंडी ‘झगामगा मला बघा… आली रे आली शेवंता आली’ हा संवाद ऐकताना एकदम भन्नाट वाटतो आहे. याआधी प्रियदर्शनी इंदलकर ‘सोयरिक’,’भाऊबळी’ या चित्रपटात दिसली आहे. विश्वास जोशी दिग्दर्शित ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’चे प्रस्तुतकर्ते विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट आहेत. तर जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर निर्माते आहेत.
Discussion about this post