Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘MAD केलंय तू..’; MHJ फेम शिवाली परबच्या गाण्याने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 17, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mad Kelay Tu Song
0
SHARES
24.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा जणू पवित्रा घेतला आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांची अनेक अवली कलाकारांसोबत भेट घडवली. समीर चौघुले, नम्रता संभेराव, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि बरेच कलाकार या कार्यक्रमातून प्रकाश झोतात आले. ज्यामध्ये शिवाली परबचा देखील समावेश आहे. आपल्या भन्नाट विनोदी टायमिंगने तिने प्रेक्षकांना पुरतं मॅड केलंय. यांनतर आता तिचं एक कडक गाणं रिलीज झालं. जे सोशल मीडियावर तुफान गाजतंय.

अभिनेत्री शिवाली परबचं ‘मॅड केलंय तू’ हे गाणं सोशल मीडियावर १५ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचा टिझर आल्यापासून प्रेक्षक याच्या प्रतीक्षेत होते. त्यानंतर जेव्हा हे गाणं रिलीज झालं.. तेव्हापासून गाण्याचा मॅडनेस काही प्रेक्षकांवरून उतरेना झालाय. या गाण्यात खानदेशातील शेतकरी कुटुंबातील विशाल राठोड आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब यांची भन्नाट केमिस्ट्री पहायला मिळतेय.

View this post on Instagram

A post shared by Shivali Parab (@parabshivali)

व्ही.आर. म्युझिक या यूट्यूब चॅनलवर हे गाणे प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.’मॅड केलंस तू’ म्हणत तरुणाईला प्रेमात पाडणाऱ्या या गाण्याला सागर जनार्दन याने संगीत दिलं आहे. तर या गाण्याचे बोल सागर जनार्दन आणि रोहन साखरे यांनी शब्दबद्ध केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shivali Parab (@parabshivali)

हर्षवर्धन वावरे आणि लरीसा अलमेडिया यांनी हे गाणं गायलं आहे. तसेच गाण्याचे दिग्दर्शन मनीष महाजन यांनी केले आहे आणि गाण्यासाठी छायाचित्रकार म्हणून सूरज राजपूत यांनी काम पाहिले आहे. सीएम राठोड यांनी गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच चुलबुली शिवालीचा लाजरा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळाला आहे. त्यात विशाल आणि शिवाली यांची एक फ्रेश जोडी देखील भेटीला आली आहे. विशाल हा मूळ वडगाव अंबे पाचोरा तालुक्याचा असून या गाण्याच्या निमित्ताने शेतकऱ्याच्या मुलाचं सिनेसृष्टीविषयीचं स्वप्न नव्याने पूर्ण होताना दिसतं आहे.

Tags: Instagram PostMHJ FameNew Song ReleaseShivali ParabViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group